कंधार (प्रतिनिधी )
लोहा-कंधार मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे पुतणे तथा युवा नेते रोहित पाटील शिंदे यांनी युवा उद्योजक तथा युवा नेते विक्रांत दादा शामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपत बारूळ येथील पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याच्या 50 किट चे वाटप करून युवा नेते विक्रांतदादा शिंदे यांचा सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
बारूळ येथील सामाजिक कार्यकर्ते ओमलाला ठाकूर यांनी बारूळ येथील अतिवृष्टीने अनेक घरात पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले होते, लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांचे चिरंजीव युवा उद्योजक विक्रांत पाटील श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काल गुरुवारी 9 सप्टेंबर रोजी युवानेते रोहित पाटील शिंदे यांच्या हस्ते अतिवृष्टीने बाधित शेतकरी व नागरिकांना अन्नधान्याच्या 50 किटचे वाटप करण्यात आले,
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण सावकार कुंभारे, माधव शिंदे, चंद्रकांत कंकाळ ,अभिजीत पाटील कदम, पंडित जाधव, इस्माईल शेख ,सूर्यकांत वाघमारे, सुभाष पवार ओम प्रकाश कांबळे योगेश वाघमारे ,पद्माकर वाघमारे, दीपक मोरे, केशव मोरे ,मारुती सोमवारे, माधव पवार सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाढदिवसानिमित्त इतर गोष्टींवर वायफळ खर्च न करता सामाजिक कार्यकर्ते व ओम लाला ठाकूर यांनी लोहा ,कंधार मतदारसंघाचे युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टीने बाधित शेतकरी व नागरिकांना 50 अन्नधान्याच्या किटचे वाटप करून युवा नेते तथा उद्योजक विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.