कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहरातील शिवाजीनगरात सुंदर अक्षर कार्यशाळा नानाविध उपक्रमाने परिचीत आहे.सृजनशीलता म्हणजे सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार आत्माच आहे.या पुर्वी अनेक इकोफ्रेंडली आरास करतांना सिताफळ,कागदी चहाचे कप,पाणी बाॅटल,अशा अनेक माध्यमातून सुंदर आरास दरवर्षीच करतात.या वर्षी आईस्क्रीमच्या रिकाम्या कोनाचा वापर करून श्री गणेशाचे सिंहासन तयार केले आहे.
यासाठी लागणारे कोन आमचे सहकारी मित्र मा.बालाजीराव ठाकुर सर यांनी जिल्ह्यावरुन आणले आहेत. गौरी पुजनाची आरास कल्पकतेने तयार करतात.अनेकांना त्यांची आरास पाहण्याची उत्कंठा असते.यंदाची गणेश मुर्ती लालबागच्या राजाची आहे.
सिंहासन तयार करतांना सहज मिळणाऱ्या व मानवास उपयोगी पडणाऱ्या वस्तू वापरुन श्री गणेश,गौरी,दुर्गादेवी या उत्सवात उत्कृष्ट आरास ही सुंदर अक्षर कार्यशाळेचे खास वैशिष्ट्य आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात आमची दरवर्षीची परंपरा अखंडीत आहे.चौदा विद्या अन् चौसष्ट कलेची देवता….पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात आरंभ केली.
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर व एमेकर परिवार क्रांतिभुवन बहाद्दरपुरा व कंधार यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या सर्वांना मनस्वी सदिच्छा!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार