प्रतिनिधी, कंधार
मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, ता.उमरी जि.नांदेडतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार कंधारचे पत्रकार राजेश्वर कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल, शाल, पुष्पहार व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार सोमवार २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, बितनाळ, उमरी येथे एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
राजेश्वर कांबळे हे कंधार मधील नामांकित पत्रकार आहेत. गेल्या १८ वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी नि:पक्ष, निर्भीड व अभ्यासू पत्रकार अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, पर्यावरण, साहित्य, धार्मिक, क्रीडा व कृषी आदी क्षेत्रातील अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने लिखान केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून उपेक्षित, वंचित व शोषितांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. तसेच विविध संघटनेची पदे भुषविले आहेत. त्यांचे सामाजिक कार्य कौतुउकास्पद आहे. त्यांच्यावर आठ लेख प्रकाशित झाले आहेत. ते अर्थशास्त्राचे अभ्यासक, स्वच्छतादूत व पक्षीमित्र आहेत. यापूर्वी त्यांना नेहरू आंतरराष्ट्रीय सामजिक पुरस्कार, राज्यस्तरीय पत्रकारत्न पुरस्कार, कोविड योद्धा पुरस्कार, पत्रकारिता सन्मान पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार आदी पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राजेश्वर कांबळे यांना सन २०२० या वर्षाचा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपेक्षित, वंचित, शोषित व दीनदुबळ्यासाठी काम केले. आई-वडीलांच्या आशीर्वादामुळे ते शक्य झाले. प्रतिष्ठानने कार्याची दखल घेतली. याचा मला खूप आनंद झाला. मी या प्रतिष्ठानचा आभारी आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार आजी कालवश नागरबाई कांबळे यांना अर्पण करतो. हा पुरस्कार मला प्रेरणा देईल, अशी भावना त्यांनी युगसाक्षी च्या प्रतिनीधीशी बोलताना व्यक्त केली.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जेष्ठ साहित्यिक प्रा.डाॅ.ऋषिकेश कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य एस.एस.जाधव, सचिव नागोराव डोंगरे, प्रतिभावंत साहित्यिक गंगाधर ढवळे, अ.भा.आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे प्रशांत वंजारे, कवयित्री तथा लेखिका रुपाली वैध, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, माजी सैनिक विकास समितीचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, शिवसेनेचे लोहा विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष गवारे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष मोहम्मद हामेदोद्दीन, गोसावी युवा शक्ती संघाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ गिरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साहेबराव ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशसचिव अॅड.अंगद केंद्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे, जेष्ठ पत्रकार प्रो.डॉ.गंगाधर तोगरे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे, शहराध्यक्ष निलेश गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष अॅड.गंगाप्रसाद यन्नावार, प.स.सदस्य सुधाकर सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते परशुराम केंद्रे, संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे, तालुकाध्यक्ष विजेंद्र कांबळे, नगरसेवक प्रतिनिधी शैलेश बोरलेपवार, माजी नगरसेवक विक्रम मंगनाळे, व्यंगचित्रकार धनाजी वाघमारे, बोरी (खु) गावच्या सरपंच सौ.सुनिता पंदनवड, बाबुळगावच्या सरपंच सौ.मुद्रीकाबाई गित्ते, भुत्याचीवाडीच्या सरपंच सौ.तारामती भुत्ते, पानभोसी गावचे उपसरपंच शिवकुमार भोसीकर आदींनी राजेश्वर कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.