नको ऑनलाईन- नको पंचनामा , साहेब तुम्हीच आमचे मायबाप सरसकट मदत द्या ना.,,! खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समोर शेतकऱ्यांचा टाहो..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

शेतकऱ्यांच्या मानगुटी कोणाकोणाची टांगती तलवार , धरणी माता होती द्यायला तयार परंतु निसर्गाच्या प्रकोपाणे हिरावला तोही आधार. किती सहन करायचा कोणाकोणाचा लहरीपणा , साहेब आतातरी सरकारला ओला दुष्काळ जाहीर कर म्हणा. अशा केविलवाण्या व्यथा आज फुलवळ येथील शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समोर मांडल्या तेंव्हा एकच आवाज होता आता नको ऑनलाईन नको पंचनामा , साहेब तुम्हीच आमचे मायबाप मग सरसकट मदत द्या ना…

ता.१० सप्टेंबर रोजी नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा लोहा , कंधार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी आणि त्या त्या भागातील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी चा नियोजित दौऱ्यात लोहा , कंधार नंतर फुलवळ मार्गे मुखेड ला जात असताना फुलवळ येथील शेतकरी , ग्रामस्थ यांच्याही व्यथा ऐकून घेण्यासाठी थांबले होते . यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार मुंडे , तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख , त्या त्या विभागाचे प्रमुख ,कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

चिखलीकर यांच्या सत्काराचे नियोजन होते परंतु माझा शेतकरीराजा संकटात असताना असे सत्कार सोहळे नको म्हणून त्यांनी सत्कार घेणे टाळत मी सत्कारासाठी नाही तर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलोय म्हणत सत्कार टाळला.

यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी मांडलेल्या व्यथावर चर्चेअंती बोलतांना खासदार चिखलीकर म्हणाले की या नैसर्गिक प्रकोपाचे संकट हे सध्या सर्वत्रच असून बळीराजाच्या तोंडचा घास ऐन भरात या आपत्तीने हिसकावून घेतला आहे . तेंव्हा अतिवृष्टी ग्रस्तांच्या सोबत आपण सदैव असून सध्या सर्वत्र सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात येतील. तसेच ऑनलाईन तक्रार किंवा ऑफलाईन कृषी विभागाकडे आपण सर्वांनी तक्रार करून ठेवावी , लवकरच सरकार दरबारी हा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन ही खासदार चिखलीकर यांनी यावेळी दिले.

यावेळी ग्राम पंचायत फुलवळ व समस्त गावकऱ्यांच्या वतीने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ सरसकट मदत जाहीर करावी असे लेखी निवेदन दिले . सोबतच विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात यावा यासंदर्भात ग्राम पंचायत च्या वतीने लेखी निवेदन दिले , तसेच येथील राष्ट्रीय महामार्ग चे रखडलेले काम तात्काळ चालू करावे यासाठी ही निवेदन देण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष भगवान राठोड,भाजप शहर प्रमुख गंगाप्रसाद यन्नावार, राजहंस शहापुरे, सुनील कांबळे, सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे, ग्राम पंचायत सदस्य चंदबस मंगनाळे , प्रवीण मंगनाळे , मुंडेवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर मुंडे ,वाखरडचे सरपंच, कंधारे वाडी चे सरपंच ,फुलवळचे सर्व पत्रकार तसेच दत्ता डांगे, आनंदा पवार, इस्माईल शेख, दीपक बसवंते , धम्मानंद जाधव तसेच गावातील नागरिक , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *