कंधार ता.
कंधार तालुक्यात मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले व घरांची पडझड झाली आहे . त्यांना तात्काळ पंचनामे करून सरसगट नुकसानभरपाई देण्यात यावी यासाठी कंधार पंचायत समिती सर्वसाधारण सभा सभापती लक्ष्मीबाई घोरबांड यांच्या अध्यक्षतेखाली ठराव घेऊन शासनाकडे मागणी केली आहे.
कंधार पंचायत समितीची सर्वसाधारण सभा दि.८ दिवशी सभापती लक्ष्मीबाई घोरबाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आली.यावेळी
कंधार तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी ,ढगफुटी झाली आहे त्या मुळे शेतकऱ्यांचे खरीपाचे पिके संपूर्ण नष्ट झाली आहेत तर अनेक गावांमध्ये नदी नाले यांनी आपला प्रवाह बदलल्याने शेत जमीन खचून वाहून गेली आहे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देण्या साठी त्यांना सरसगट नुकसानभरपाई द्यावी कंधार पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी मांडला व कंधार पंचायत समिती सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते ठराव पारित करून शासनाकडे मागणी केली.
यावेळी कंधार पंचायत समिती सभापती लक्ष्मीबाई घोरबांड पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे ,सदस्य उत्तम चव्हाण, शिवा नरंगले सुधाकर सूर्यवंशी ,आम्रपाली कदम, रेखाताई धुळगंडे गटविकास अधिकारी मांजरमकर विस्ताराधिकारी तिरुपती गुट्टे कृषी अधिकारी देशमुख, गट शिक्षण अधिकारी संजय येरमे, विस्तार अधिकारी अशोक सोनकांबळे तालुका आरोग्य अधिकारी ढवळे , शाखा अभियंता डी.बी.बनसोडे यांची उपस्थती होती.