कंधार ; प्रतिनिधी
रिपब्लिकन सेना कंधार तालुकाध्यक्ष पदी विलास भाऊराव सोनकांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे.
रिपब्लिकन सेना सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच आदेशावरून व पक्षबांधणीसाठी आपल्या कार्याची दखल घेवुन आपण आपल्या केलेल्या कार्याची उल्लेखनीय कामगीरी पक्ष शिस्तीच्या अधिन राहुन व पक्षाने दिलेल्या आदेशांचे पालन करून पुढील कार्य करण्यासाठी आपले राजकिय, सामाजिक व इतर कार्य पाहुन आपणास रिपब्लिकन सेनेच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील नियुक्ती कार्यकाळ २०२० ते २०२४ पर्यंत राहणार आहे.जिल्हाध्यक्ष, नांदेड (दक्षिण) अनिल सिरसे यांच्या स्वाक्षरीसह नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
या निवडीबद्दल विलास भाऊराव सोनकांबळे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.