कंधार ; प्रतिनिधी
देशाचे नेते माननीय खासदार शरदचंद्रजी पवार व शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या वर विश्वास टाकून आज रविवार दि.१२ सप्टेंबर रोजी कंधार येथे पक्ष कार्यालयात अँड.देवानंद देशमुख,अँड.सय्यद सादिक,अँड.जयप्रकाश देऊळगावकर यांनी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला .
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस कंधार तालुका अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,राष्ट्रवादी काँग्रेस ता.उपाध्यक्ष गोपीनाथ केंद्रे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष संतोष कागणे आदीची यावेळी उपस्थिती होती.