साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती हायटेक करणार ….! वेबिनार, फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून व्याख्यानमाला चे कंधारात आयोजन

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती हायटेक करणार ….!
वेबिनार, फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून व्याख्यानमाला चे कंधारात आयोजन

कंधार;

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमित्त मिरवणूक न काढता साध्या पध्दतीने साजरी करण्याचा मानस असला तरी
वेबिनार, फेसबुक लाईव्ह माध्यमांची मदत घेऊन व्याख्यानमाला सह हायटेक जयंती करणार असल्याची माहीती कंधार सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने दि.२८ जुलै रोजी जयंती मंडळाचे अध्यक्ष रविराज जाधव यांनी दिली.

जगभरात कोरोनाने थैमान सुरु आहे. शासनाच्या नियमांचा आदर करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीची मिरवणूक न काढता अगदी साध्या पध्दतीने करणार असल्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. यंदा डिजिटल प्लॅटफॉर्मवर जयंती साजरी करण्यात येणार आहे. यामध्ये वेबिनार, फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून व्याख्यानमाला, चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, पोलीस यांचा सन्मान करणार आहेत. प्रशासनाला गरज भासल्यास सार्वजनिक जयंती मंडळाचे सदस्य कोरोना काळात मदत करण्यास इच्छुक आहेत.या पत्रकार परिषदेला दयानंद मळगे, ऋषिकेश राजकौर, साईनाथ मळगे, प्रशांत दासरे, आकाश बसवंते, विजय वाघमारे, संदीप गवाले, अजिंक्य कांबळे, अजय कांबळे, अरविंद नवघरे, व्यंकट कांबळे, आकाश गडंबे , राहुल घोडजकर, अजय, वाघमारे, मोनज कांबळे, महेश कांबळे, सार्वजनिक जयंती मंडळाचे नवनियुक्त पदाधिकारी,साठे नगर मित्रमंडळ व समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *