कंधार ; प्रतिनिधी
कंधार न.पा. चे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे निष्ठावंत जेष्ठ नेते, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी रामराव पवार यांच्या पत्नी तथा विद्यमान सन्मानित कॉग्रेस नगरसेविका लक्ष्मीबाई रामराव पवार यांचे दि.१४ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .आज दि.१५ सप्टेंबर रोजी कंधार येथिल स्मशान भुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे. त्या युवक कॉग्रेस कंधार तालुका सचिव बाळासाहेब पवार यांच्या आई होत. लक्ष्मीबाई रामराव पवार यांनी तिनवेळा नगरसेविका म्हणून जनसेवा केली आहे.