नांदेड दि.18 – नांदेड शहरातील श्रीचे विसर्जन उद्या दि.19 रोजी होणार आहे.. गोदावरी व आसना नदीच्या परिसरात यासाठी वेगळे तलाव करण्यात आले असून श्री विसर्जनाच्या ठिकाणीची संपूर्ण पाहणी आज दि. 18 रोजी आ.अमरनाथ राजूरकर, महापौर सौ .मोहिनी येवणकर यांनी अधिका-यांसह केली.
यावेळी विसर्जनादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डाॅ. सुनील लहाने, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख डाॅ. बेग आदींची उपस्थिती होती . विसर्जना दरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. दोन्ही नद्या प्रदूषित होऊ नयेत याची मनपा प्रशासनाने काळजी घ्यावी, अशा सूचना आ. राजूरकर यांनी यावेळी केल्या.