पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मगनपुरा येथील आर.आर. मालपाणी मूक बधिर व मतिमंद विद्यालयात स्वेटर वाटप

मतिमंद बालकांची देखभाल करणे हे अतिशय अवघड काम असल्यामुळे शिक्षकांचे करावे तितके कौतुक कमी आहे हे असे प्रतिपादन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मगनपुरा येथील आर.आर. मालपाणी
मूक बधिर व मतिमंद विद्यालयात लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे स्वेटर वाटप करत असताना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लायन्स सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा यांनी प्रास्ताविक केले. मुरलीधर गोडबोले, व्यंकट मोकले, शांताबाई काबरा,गणेश धुळे,मधुकर मनुरकर
यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे अशोक पाटील धनेगावकर, सुशीलकुमार चव्हाण, व्यंकटेश जिंदम, अनिल हजारी, कामाजी सरोदे ,लायन्स कोषाध्यक्ष सुरेश निलावार, सहसचिव सुरेश शर्मा, माजी अध्यक्ष संजय अग्रवाल, लायन्स प्रोफेशनल अध्यक्ष योगेश पाटील यांची उपस्थिती होती. अरुणकुमार काबरा, प्रतिभा काबरा, स्वाती काबरा, स्मिता राठी यांच्या हस्ते मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. सुनील पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन कामाजी सरोदे यांनी तर आभार डॉ. मनीषा तिवारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी किरण रामतीर्थे
आनंद शर्मा, संजय रुमाले , सौ. इंदुताई देशमुख, सौ.संगीता नरवाड़े, श्याम घँटेवाड , गयाबाई सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले. हिवाळा लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना स्वेटर दिल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.

( छाया : सचिन डोंगळीकर व नरेंद्र गडप्पा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *