भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ वाचन समारोप प्रसंगी तैवान येथील भंते श्रद्धारख्खिता यांची प्रमुख उपस्थिती ; डोंगरे प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण



नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळ व भारतीय बौद्ध महसभा बितनाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथवाचनाचा सांगता समारंभ आज बितनाळच्या बुद्ध विहारात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. एस. जाधव हे राहणार असून उद्घाटक एम. सायलू म्हैसेकर, स्वागताध्यक्ष नगरसेवक ईश्वर सवई, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, पोलिस निरीक्षक भोसले, नगरसेवक सोनू वाघमारे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य महासचिव पांडूरंग कोकुलवार, भारतीय बौद्ध महासभा उमरी तालुकाध्यक्ष भीमराव वाघमारे, सरपंच मारोती वाघमारे, साहित्यिक समीक्षक गंगाधर ढवळे, प्रा. डॉ. गंगाधर तोगरे आदींची उपस्थिती राहणार आहे. 


             वर्षावास पर्वानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनास आषाढ पौर्णिमेला प्रारंभ झाला होता. आता भाद्रपद पौर्णिमेचे औचित्य साधून ग्रंथ वाचनाचा सांगता समारोह उमरी तालुक्यातील मौजे बितनाळ येथे संपन्न होणार आहे. सकाळच्या सत्रात धम्मध्वजारोहण, परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, सूचक-वाचकांचा सत्कार, धम्मदेसना आदी कार्यक्रम होणार आहेत. माय तुझा ओलावा या विषयावर प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान होईल आणि त्यानंतर भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने घोषित विविध क्षेत्रातील प्रा. संध्या रंगारी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, प्रा. डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, कवयित्री छाया कांबळे यांच्यासह अकरा मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेकडून उपस्थितांना भोजनदान दिले जाणार आहे. 


             तिसऱ्या सत्रात सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पंचेचाळीसाव्या काव्यपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कवयित्री बालिका बरगळ यांच्या अध्यक्षतेखाली काव्य पौर्णिमा हा बहारदार कार्यक्रम संपन्न होईल. काव्य पौर्णिमेचे संवादसूत्र आॅनलाईन कवी कट्ट्याचे संयोजक प्रा. अशोक कुबडे हे हाती घेणार असून ज्येष्ठ कवी कवयित्रींसह अनेक नवोदितांना या कविसंमेलनात संधी उपलब्ध होणार आहे.

या सोहळ्यासाठी प्रतिष्ठानचे नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, गोविंद बामणे, भीमराव ढगारे, संतराम डोंगरे, श्रावण तुरेराव, संजय डोंगरे, संभाजी डोंगरे, लक्ष्मण डोंगरे, भीमराव शेवाळे, प्रशांत शेळके, श्रीकांत डोंगरे, नागोराव कदम, राहुल जाधव, साहेबराव तुरेराव, प्रकाश डोंगरे, प्रल्हाद डोंगरे यांच्यासह बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *