माळाकोळी ; एकनाथ तिडके
वंचित, उपेक्षित, गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राजकारणात उतरलो असून प्रदीर्घ प्रशासकीय कामकाजाच्या अनुभवाचा फायदा राजकारणात करून अशा उपेक्षित लोकांची सेवा करण्याचा आपला हेतू आहे. लोहा कंधार तालुक्यातील जी दुर्लक्षित गावे आहेत जिथे भौतिक सुविधांची कमी आहे अशा गावांच्या विकासाकडे आपण प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले .
ते माळाकोळी सर्कल मधील घुगेवाडी व लव्हराळ येथे आयोजित सभाग्रह भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,सभापती संदीप उमरेकर, उपसभापती शाम पवार, सरपंच मोहन काका शूर, सुधाकर सातपुते, सरपंच पांडुरंग नागरगोजे, सरपंच दत्ता ससाने,उपसरपंच निखिल मस्के, उपसरपंच बाबासाहेब बाबर, मधुकर बाबर, मल्हारी हिंगणे, सिद्धेश्वर वडजे, चक्रधर डोके केशवराव तिडके माजी सरपंच व्यंकटराव तिडके चंद्रकांत केंद्रे मनोज भालेराव दत्ता बगाडे, कृष्णा मस्के, पुंडलिक बोरगावकर, मारुती येजगे, नामदेव जाधव, गंगाधर साबळे, शिवाजी साबळे ,हरिश्चंद्र साबळे, प्रकाश साबळे, माधवराव साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमदार शामसुंदर शिंदे यांच्या आमदार निधीतून मौजे घुगेवाडी येथे आठ लक्ष रुपयांचे संस्कृतीक सभागृह बांधकाम तर मौजे लव्हराळ येथे अठरा लक्ष रुपयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह बांधकाम करण्यात येत आहे या कामाचा शुभारंभ आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते दि. 19 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.
लोहा कंधार तालुक्यातील अनेक गावे येथील लोकप्रतिनिधींनी विकासापासून वंचित ठेवली आहेत या अशा दुर्लक्षित गावांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत आहोत अशा गावांच्या सर्वच समस्या संदर्भाने विकास आराखडा आपण तयार केला असून टप्प्याटप्प्याने अशा गावांचा विकास साधला जाणार आहे लोहा कंधार तालुक्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना टप्प्या-टप्प्याने पूर्ण करणार आहोत, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी बँका तसेच शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून त्यांना लघुउद्योग व रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मी राजकारणात वंचित उपेक्षितांच्या गोरगरिबांच्या सेवेसाठी आलो असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील म्हणाले, लोहा कंधार तालुक्यासाठी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असून सिंचन ,रोजगार, पाणीपुरवठा आदी प्रश्नाच्या बाबतीत प्राधान्यक्रमाने कामे होत आहेत, माळाकोळी जिल्हा परिषद गटात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून विकासकामे सुरू आहेत.
सुत्रसंचालन संजय नागरगोजे व विकास जोंधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगाधर साबळे यांनी केले.