नांदेड (प्रतिनिधी)- गरीबाला काम करुनही उदरनिर्वाह करणे अवघड झाले असून गरीब आणि कष्टकरी वर्गाला शिवभोजन थाळी वरदान ठरली आहे. या शिवभोजन थाळीचा गरीब आणि गरजुवंत लोकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केेले.
शिवराय नगर येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सौ. अनुराधा मठपती व संतोष दगडगावकर यांच्या स्वराज्य जननी महिला बचत गटाच्या वतीने शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी चव्हाण बोलत होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारने शिवभोजन थाळी हा उपक्रम सुरु केला, यामुळे गरीब व गरजुंना याचा चांगला फायदा होत आहे.
मजुरांनी दिवसभर काम करायचे त्यात उदरनिर्वाह करायचा ही बाब अत्यंत अवघड असून शिवभोजन थाळीमुळे गरीबांना भोजन उपलब्ध झाले आहे. दानात दान अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. याची जाणिव प्रत्येकानी ठेवावी या शिवभोजन थाळीचा गरीब व गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी केले.
यावेळी आ. अमरनाथ राजुरकर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी सभापती तथा नगरसेवक किशोर स्वामी, महापौर प्रतिनिधी विजय येवनगर, माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील घोगरे, नगरसेवक उमेश पवळे, नगरसेवक आनंद चव्हाण, नगरसेवक सतिश देशमुख तरोडेकर, नगरसेवक राजु पाटील काळे, केदार पाटील साळुंके, नगरसेवक ज्योती कल्याणकर, नगरसेवक प्रतिनिधी किशन कल्याणकर, दिपक पाटील, सखाराम तुप्पेकर, संतोष मुळे, धम्मपाल कदम, संजय मोरे, माधव डोम्पले, शिवाजी पवार, महेश स्वामी, मनोज मोरे, राज गोडबोले, साईनाथ स्वामी, राजेश लहानकर, सौ. आनंदी धनगिरे, सौ. भद्रा मंगनाळे, संगीता लामतुरे, सिमा स्वामी यांची उपस्थिती होती.