नांदेड ; प्रतिनिधी
लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड मिड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत चतुर्दशी निमित्त नांदेड शहरातील विविध गणेश मंडळांच्या ठिकाणी जाऊन जमा केलेले गाडीभर निर्माल्य जिल्हाधिकारी डॉ. विपिन, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे व प्रवीण साले यांच्या उपस्थितीत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्फत महापालिकेकडे सुपूर्द केले.
गोदावरी शुद्ध राहावी यासाठी लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड मिडटाऊन यांच्या तर्फे तयार करण्यात आलेल्या निर्माल्य रथाची पूजा मीडटाऊनचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आली.एसटी कर्मचारी गणेश मंडळ बस स्थानक नांदेड येथे योगेश जैस्वाल यांच्या हस्ते गणपतीची आरती करून
निर्माल्य संकलन मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. विजय भारतीया
यांनी प्रास्ताविक केले., संजय अग्रवाल, नरेश व्होरा यांची समयोचित भाषणे झाली झाली. गेल्या 31 वर्षापासून सातत्याने एसटी कर्मचारी गणेश मंडळाला श्री ची मूर्ती देत असल्याबद्दल ॲड. दिलीपभाऊ ठाकूर यांचा जय कांबळे यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.लायन्स मिड टाऊन सचिव विश्वजीत राठोड, शिरीष गीते,प्रोजेक्ट चेअरमन
संतोष देशपांडे व सतीश पाटील यांचा गणेश मंडळाच्या वतीने दिनेश ठाकूर, नागभूषण दुसा, जयवंत मुरकुटे, बी.एल. शिंदे ,दिलबागसिंग, राजेश कांबळे यांनी सत्कार केला. या नंतर लायन्स सेंट्रल सचिव
अरुणकुमार काबरा,कोषाध्यक्ष
सुरेश निल्लावार, सहसचिव सुरेश शर्मा यांनी विविध भागात जाऊन निर्माल्य संकलन केले.
लायन्स सदस्यांनी दिवसभर फिरून जमा केलेले निर्माल्य महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले. समारोप प्रसंगी विजय गंभीरे, व्यंकट मोकले , अनिलसिंह हजारी, सुशील चव्हाण, नवल पोकर्णा, केदार नांदेडकर, ॲड. मिलिंद लाटकर, राज यादव,सचिन रावका, रुपेश व्यास, हरभजन सिंग पुजारी श्रीराज चक्रवार, सोनू उपाध्याय, कीर्ती छेडा, अनिल लालवाणी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सह सर्व अधिकाऱ्यांनी लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड मिड टाऊन यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
(छाया: सचिन डोंगळीकर ,नरेंद्र गडप्पा,व्यंकटेश संजयकुमार गायकवाड )