प्रबोधनाचा जागर घालणारे :प्रा. डॉ.रामकृष्ण बदने

कंधार प्रतिनिधी /उमर शेख

(आज दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी माझे जेष्ठ बंधू प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांना मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरी जि.नांदेड तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय “माऊली रत्न पुरस्कार” प्रदान केला जात आहे, त्या निमित्त त्यांच्या कार्यकतृत्वावर टाकलेला हा शब्दप्रकाश)


मानवी जीवनाची विशेषता कर्मावरून व व्यक्तिच्या व्यक्तीमत्त्वावरून ठरत असते.तो व्यक्ती सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रात उत्तम कार्य करत असेल तरच तो भला माणूस आहे.अन्यथा संत म्हणतात त्याप्रमाणे येर काय ती बापुडी l चिर अहंकाराची घोडी ll खरं पाहिलं तर माझे अण्णा-माय म्हणजे मायाळू दयाळू आणि धार्मिक स्वभाव असलेले. गावात भजन, कीर्तन,प्रवचन व भावार्थरामायण हे नित्यक्रमाने आवडीने ऐकणारे,लहानपणापासूनच बदने सरांना( मी त्यांना दादा म्हणतो) अण्णा सोबत भजन, कीर्तन, प्रवचन व भावार्थरामायण ऐकण्याची व प्रत्यक्ष रामायण वाचण्याची आवड निर्माण झाली.तसे पाहिले तर माझे गाव देवकरा ता.अहमदपुर जि.लातुर हे परमार्थीक गाव. याचे कारण म्हणजे गूरुवर्य वै.संत मोतीराम महाराज हे आमच्या वार्षिक सप्ताहात ०७ दिवस उपस्थित राहत असत.तीच परंपरा वै. संत मारोतराव महाराज दस्तापुरकर यांनी चालवली.संत माधवबाबा, संत सोपान काका ईसादकर यांच्या प्रबोधनामुळे आजही गावात धार्मिक वातावरण खूप सुंदर आहे.

या संतांच्या कृपा आशीर्वादाचा आमच्या कुटुंबावर फार मोठा प्रभाव पडला ‘कृपा दान केले संती lकल्पांतीही सरेना ll’ दादांना लहानपणापासूनच भजनातील अंभग म्हणणे असो की किर्तन, प्रवचन, धुपारती असो त्यात सहभाग घ्यायचा एक छंदच लागला.खरे पाहिले तर घरची परिस्थिती बेताचीच असल्याने प्राथमीक शिक्षण गावातच जि.प.हायस्कूल देवकरा येथे झाले.पुढे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी देवकरा ते किनगाव ता.अहमदपुर हा पाच किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. दहावी पर्यंत जि.प.प्रशाला किनगाव येथे शिक्षण घेतले. उच्च माध्यमिक व बी.ए.चे शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथून पुर्ण केले. हे शिक्षण घेत असताना अनंत आर्थिक अडचणी वडीलांना (अण्णांना)आल्या पण अण्णांनी गावात सोयऱ्यां कडून हात उसने पैसे मागून शिक्षण शिकविले, अण्णांना शेतीची फार आवड होती,पण शेतीसाठी बैलजोडी मिळत नाही यास्तव गावातील दुसऱ्या व्यक्तीबरोबर त्यांची व आमची जमीन वाहून घ्यायची, आणि आमच्या हिंगणगाव च्या आजोबांची जमीन वाहून घ्यायची.आमच्यावर मामांचे फार मोठे उपकार आहेत.

अण्णानीं तिन्ही मुलांना शिक्षणा अभावी घरी बसू दिले नाही, त्याचा परिणाम प्रा.बदने सर आज अनेक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत. पूढे महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथून बी.ए. केल्यानंतर शासकिय अध्यापक महाविद्यालय परभणी येथून बी.एड.केले नंतर लातुर येथील दयानंद कला महाविद्यालयातून एम.ए.हिंदी केले. त्याकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून हिंदी विषयांत एम.ए.ला (सुवर्ण पदक) प्राप्त केले. नंतर ते १९९२ रोजी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर,ता.मुखेड.येथे अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्य करत असताना 1996 रोजी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.एवढ्यावरच न थांबता सदोदित आपण शिकले पाहिजे ही जिद्द कायम ठेवून, त्यांनी 2005 मध्ये नांदेड विद्यापीठातून हिंदी या विषयात “नागार्जुन के कथा साहित्य मे जनवादी चेतना,” या विषयावर पी.एच.डी. प्राप्त केली.

एकाच पदावर स्थिर न राहता याच महाविद्यालयात उपप्राचार्य ,प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक व आज या क्षणाला ते “प्रोफेसर “म्हणून कार्यरत आहेत.याशिवाय शिक्षण क्षेत्रातील कार्याबरोबरच त्यांनी विविध विषयांवर व्याख्यान,प्रवचन,कीर्तन व लेखन केले आहे. त्यांनी “आई “या विषयावर महाराष्ट्र भर 1000 च्या वर व्याख्यान दिली आहेत.याची दखल घेऊन मातोश्री भागाबाई विठ्ठलराव डोंगरे प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय “माऊली रत्न पुरस्कार त्यांना आज प्रदान केला जातोय. याचा मनस्वी आनंद वाटतो. प्रबोधनाचा जागर घालण्याचे काम ते सदोदित करतात.येथून मागेही त्यांना उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार ,गुरू गौरव पुरस्कार ,महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार,मराठवाडा भूषण पुरस्कार ,महाराष्ट्र भूषण पुरस्कार व यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा “उत्कृष्ट प्राध्यापक” (ग्रामीण )पुरस्कार जाहीर झाला आहे.आतापर्यंत त्यांना तीसपेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त आहेत.

प्रा.डॉ. रामकृष्ण बदने दादा लिखाणाच्या माध्यमातून विविध विषयावरील लेख अनेक वृत्तपत्रातून प्रसारित करत असतात, एवढेच नाही तर त्यांची काही पुस्तके प्रकाशित आहेत, त्यापैकी “बोलू काही थोरा विषयी”, विचारधन यशस्वी जीवनाचे, “,नागार्जुन के कथा साहित्य मे जनवादी चेतना”, विमुक्त ,याचा समावेश आहे खरे पाहिले तर त्यांच्या मनात अनेक क्षेत्रात कार्य करण्याची उमेद आहे, ते कार्य ते करतात प्रवचन ,कीर्तन, व्याख्यान ,या माध्यमातून हे कार्य सदोदीत चालु असते ,गेल्या मार्च 2019 पासून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जरी प्रत्यक्ष कार्य करायला अडचन प्राप्त झाली असली तरीही त्यांनी आपल्या कार्यात दिरंगाई न करता ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सदोदित अध्यापन करत आहेत. याद्वारे शैक्षणिक कार्य चालू ठेवले तसेच विविध विषयावर ऑनलाइन व्याख्यान,प्रवचन दिली आहेत व देत आहेत.

त्यांच्याविषयी कितीही लिहिले तरी ही कमीच आहे, संतांच्या शब्दात सांगायचे म्हटले तर “काय वाणू आता न पुरे ही वाणी l मस्तक चरणी ठेवीतसे”ll, शेवटी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान समाजाकडून झाल्यानंतर त्यांनाही प्रोत्साहन निर्माण होते दादा म्हणजे” मोकळे मन रसाळ वाणी l यांची गुणी संपन्न “ll,या पद्धतीने ते चौखूर धाव घेत जे जे उत्तम उदात्त आहे त्याला सतत संकलित करत असतात त्यावर चिंतन करत असतात, ते समाजात पोहोचवीत असतात, त्यांच्या हातून असेच समाजोपयोगी व राष्ट्रउपयोगी कार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    प्रा. योगिराज दत्तात्रय बदने  
    व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालय
 गंगाखेड,जि.परभणी

भ्रमणध्वनी -7030500107

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *