कंधार ; प्रतिनिधी
जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सव वर्षा निमित्त श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या वतीने संस्थेचे सचिव भाई गुरुनाथरावजी कुरुडे यांच्या मार्गदर्शनातून आज सोमवार दि.२१ सप्टेंबर रोजी धर्मादाय उपायुक्त नांदेड यांच्या कडे सपुर्द करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली महाराष्ट्रातील व आपल्या भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सामाजिक बांधिलकी जपत, संकट काळात केवळ धीर देऊन पाठीशी केवळ उभेच न राहता संस्थेच्या वतीने जमेल तेवढे फुल ना फुलाची पाकळी या पद्धती तिने 100000 (एक लाख) रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी आज धर्मादाय उपायुक्त नांदेड, श्री किशोरजी मसने यांच्याकडे प्रदान करण्यात आला.
यावेळी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे , संस्थेचे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे , संस्था सदस्य वैजनाथरावजी कुरूडे , उपस्थित होते.