कंधार (प्रतिनिधी)
कोरोना व डेंगू च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये रक्त साठा कमी झाला असल्याने वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने नांदेड जिल्ह्यात व तालुक्यात डेंगू संसर्ग रोगाने थैमान घातले असून विविध आजाराने रुग्ण बेजार असल्याने रक्ताची कमतरता भासू नये म्हणून वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने कंधार तालुका अध्यक्ष केशवराज तेलंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५१ तरुणाईने कंधार येथील भवानी नगर येथे रक्तदान केले आहे.
रक्तदान शिबिराला शहरातील तरुणाने चांगला प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरास वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जाधव यांची प्रमुख उपस्थित होती. तर अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पवार,प्रमुख पाहुणे अशोक पाटील कदम,पत्रकार मुरलीधर थोटे,मारोती चिलपींपरे,अंकुश कोल्हे,राजूरकर क्लासेसचे संचालक प्रा.विठ्ठल राजूरकर यांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व संयोजक तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असे सांगत तरुणाईचे कार्य उल्लेखनीय आहे. असे कौतुक मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पवार यांनी केले. वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष केशवराज संजीवकुमार तेलंग यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता.
या वेळी बळीराम पवार बोलत होते. दुसऱ्यासाठी जगणे, हेच खरे जगणे आहे. या कार्यक्रमातूनच आपण आपल्या कार्याची सुरुवात करा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जाधव यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात रक्ताची समस्या असणारच आहे.अशा कार्यक्रमांमधून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यास रक्ताचे समस्या सुटण्यास मदत होईल आणि समाजासमोर एक आदर्श उपक्रम म्हणून समोर येईल असे ते म्हणाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक मोरे,प्रथमेश भालेराव,प्रथमेश बोडेवाड,शुभम सुर्यवंशी,सोमनाथ शेकापुरे, महेश वजीरगावे,संदीप कंधारे,ऋषिकेश रासवंत, महेश केंद्रे, सुरज सावतकर व सर्व मित्र परिवारानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर तेलंग यांनी मानले.उपस्थिती मान्यवर व मित्र परिवाराच्या वतीने केशवराज तेलंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.