कंधार – प्रतिनिधी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि.१७ सप्टेंबर रोजी हुतात्मा नगर कल्हाळी ता.कंधार येथील स्वातंत्र्य सैनिक यांचा राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा संचालक कृ.उ.बा.स.राजकुमार केकाटे यांनी सन्मान केला.
हुतात्मा विर आप्पाराव नाईक श्री.अप्पासाहेब भगवंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्ती संग्रामात कल्हाळी (ता.कंधार ) गावचे शुर वीरांनी प्राणाची पर्वा न करता रजाकाराच्या विरोधात लढा दिला याच कालावधीत ३५ जणांनी युद्धामध्ये आपले प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना व हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
यावेळी हयात स्वातंत्र्य सैनिक श्री.माधवराव पाटील कंधारे,श्री.स्वातंत्र्य सैनिक राम पाटील पैनापल्ले,श्री.गंपू पाटील वडजे यांचा राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा संचालक कृ.उ.बा.स.राजकुमार केकाटे यांनी या शुर वीर स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार केला.
यावेळी प्रमुख उपस्थिती मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश सचिव डॉ. उत्तम सोनकांबळे,उपसरपंच सुरेशभाऊ कल्हाळीकर,सरपंच प्रतिनिधी गणपत तोटवाड,ग्रामसेवक एम.बी.शिंदे,पोलीस कर्मचारी बी.एम.व्यव्हारे,निळकंठ पाटील मोरे,मारोती तोटवाड,चंद्रकांत नाईक
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.सरपंच तुकाराम गुंडाजी सोनकांबळे,मा.सरपंच लक्ष्मण सोनकांबळे,नारायण देशमुख,अँड.संजय सोनकांबळे,उध्वव कल्हाळे,बाबाराव बच्चेवार,संतोष देशमुख,गोविंद देशमुख यांनी परिसरम घेतले
कार्यक्रमचे सूत्रसंचालन उपसरपंच सुरेश कल्हाळीकर यांनी केले तर आभार अक्षय सोनकांबळे मानले.