स्मृतीशेष चंद्रभान पाटील जवळेकर मामा एक निस्सीम, महान कर्मयोगी !

चंद्रभान पाटील जवळेकर मामा यांचे आकस्मिक निधन हे

खूपच धक्कादायक असून  दुर्दैवी घटना आहे. मामाच्या जाण्याने मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले असून मराठा सेवा संघ आज पोरका झाला आहे.स्मृतीशेष चंद्रभान मामा जवळेकर पाटील यांचे मराठा  समाजाच्या प्रगतीसाठी खूप मोठे योगदान असून नांदेड जिल्ह्यात सर्व प्रथम पंचवीस वर्षांपासून मराठा समाजातील गोर गरीब, शिक्षित, उच्चशिक्षित मुला मुलींचे लग्न जुळावेत म्हणून जिजाऊ वधूवरसूचक कक्षाच्या वतीने मोफत वधूवर परिचय मेळावे हजारोंच्या उपस्थितीत पार पाडून असंख्य लग्न जुळवली.यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थ्यी वसतिगृह निर्मितीत सिंहाचा वाटा उचलून अविरतपणे आजपावेतो वसतिगृह चालवून मामा आज महान कर्मयोगी ठरलेले आहेत. नवा मोंढा येथील मुलींचे वसतिगृह पूर्णत्वास जात असताना मामांनी घेतलेले कष्ट, अपार मेहनत समाज कधीही विसरणार नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन 

“जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले 

तोचि साधू वोळखावा देव तेथेची जाणावा ” 

या अभंगाप्रमाणे मामानी रंजल्या गांजल्याना आधार देवून मदत करून स्व पायावर उभे केले.गुरूदास सेवा मंडळाच्या व मराठा सेवा संघाच्या वाढीस मामानी खूप मोठा हातभार लावलेला आहे. पंढरपूर येथील गुरूदास सेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षांपासून काम करीत असताना वारकरी संप्रदायातील भक्तांना राहता यावे म्हणून सर्व सुख-सुविधेसह भव्य वारकरी निवासस्थान उभारलेले आहे.त्याचा उपयोग आषाढी एकादशीनिमित्त व इतर वेळी आलेले शेकडो वारकरी घेतात.मामानी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करून तुकडोजी महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या विचार धारेवर जवळेकर मामा कृतियुक्त जगले, समाजातील तळागाळापर्यंत पोहचून गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदत करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

आदर्श मित्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रभान पाटील जवळेकर मामा व वसतिगृहाचे प्रमुख मधुकरराव देशमुख मामा यांच्या निस्वार्थ मैत्रिचे देता येईल!

आमदार बालाजी कल्याणकर,मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा,जेष्ठ नेते धोंडू पाटील मराठा सेवा संघाचे आधारवड इंजि शे.रा.पाटील, जेष्ठ मार्गदर्शक सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे,इंजि.व्ही.टी.शिंदे, प्रा.संतोष देवराये,इंजि.सुदेश देशमुख, इंजि.तानाजी हुस्सेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उद्धवराव पाटील सुर्यवंशी,मराठा सेवा संघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर माजी जिल्हाध्यक्ष पंडितराव कदम, पी. के. कदम,संतोष गव्हाणे, भगवान कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी चंद्रभान पाटील जवळेकर मामांच्या मार्गदर्शनाला आम्ही मुकलेलो असून समाजाची अपरिमित हानी झालेली आहे.अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. 

 मामा तुम्ही आज आमच्यात नाही हे मनाला पटत नाही, आपली अशी अचानक झालेली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे.आपला भारदस्तपणा, सदा सर्वदा आनंदी चेहरा,स्मित हास्य, संयमीपणा, निगर्वी, चेहर्‍यावरील तेज,राजहंस राजबिंड व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड झाले….!

झाले बहु 

होतील बहु 

आहेतही बहु 

परंतु या समहा ! 

असा कर्मयोगी पुन्हा होने नाही!!

मराठा सेवा संघाच्या वतीने मामाना भावपूर्ण शिवांजली!

जवळेकर कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुखातून सावरण्यासाठी जवळेकर कुटुंबियांना  माॅसाहेब जिजाऊ बळ देवो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना!

शोकाकुल 

रमेश पवार 

मराठा सेवा संघ ३३ कक्ष नांदेड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *