कंधार:-प्रतिनिधी
डिगोळ तांडा ता.सोनपेठ जिल्हा परभणी येथिल तांडा वस्तीवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपींना अटक करून ते प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून त्यास फाशी द्यावी अशी मागणी कंधार भाजपा च्या वतीने तहसीलदार कंधार यांना दि.२२ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढ होत आहे आशा घटनांना प्रतिबंध करण्यास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याने अश्या घटनांत वाढ होत आहे,
डिगोळ तांडा ता सोनपेठ जिल्हा परभणी येथिल तांडा वस्तीवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून ते प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून त्यास फाशी द्यावी जने करून असे कर्त्या करणाऱ्यांची हिम्मत होणार नाही ,अशी मागणी कंधार भाजपा च्या वतीने तहसीलदार कंधार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,शहर सरचिटणीस मधुकर डांगे,भाजयुमो सरचिटणीस बालाजी तोरणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्रीराम जाधव,राजू लाडेकार,माधव जाधव,श्याम शिंदे,सतीश कांबळे,मारोती राठोड, भिमराव राठोड,कंटीराम राठोड,उद्धव डांगे,शेषराव जाधव,केशव लाडेकर यांच्या सह आदींची उपस्थिती होती.