नांदेड ; प्रतिनिधी
सध्याचे एअर चीफ मार्शल आर के एस भदौरीया हे 30 सप्टेंबर रोजी सेवा निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी व्ही आर चौधरी यांची नियुक्ती होणार आहे.
व्ही आर चौधरी हे सध्या वायू सेनेचे उपप्रमुख आहेत.
1 ऑगस्ट 2020 रोजी वायू दलाच्या पश्चिम विभागाची जबाबदारी त्यांच्या कडे देण्यात आली होती.
3800 तासांपेक्षा जास्त वायू सेनाचे विमान चालवण्याचा अनुभव त्यांच्या कडे आहे.
विवेक चौधरी हे नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्याचे रहिवासी आहेत.
नांदेड जिल्ह्यातील एक व्यक्ती वायुसेनाध्यक्ष झाले ही नांदेडकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.
भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत आणि आता वायू सेना प्रमुख विवेक चौधरी होणार आहोत.
पहिल्यांदाच भारतीय सैन्यदलाच्या प्रमुख दोन सैन्यदलाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी महाराष्ट्राचेच दोन व्यक्ती सांभाळणार आहेत.
Indian Air Force ADGPI – Indian Army