कर्तव्यदक्ष तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतिने निरोप

कंधार  ; प्रतिनिधी 

तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे कंधार तालुक्यात काम करत होते अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांनी कंधार तालुक्यात केली आहे .आता ते लोहा तहसिल येथे तहसिलदार म्हणून रुजू झाले आहेत.


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतिने आदरणीय मुंडे यांना निवेदन देवुन तालुक्यातील शिक्षक व BLO यांच्या मानधन बाबत तसेच कंधार तालुक्यातील सर्व BLO या कोरोनायोद्धा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत आदरणीय व्यंकटेश मुंडे यांना आज त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी कंधार तालुक्यातील सर्व BLO व सुपरवायझर यांना त्यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आहे .

कंधार तालुक्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच साहेबांची लोहा येथे बदली झाल्याबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतिने साहेबांचा यतोचित सन्मान करुन त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हा नेते जयवंत काळे ,जिल्हाउपाध्यक्ष मुनेश शिरसीकर ,तालुका नेते ढोणे ,तालुकाध्यक्ष हाणमंत जोगपेटे ,तालुका सचिव विकास राठोड ,उपाध्यक्ष विष्णुदास माने ,सल्लागार आनंदा कदम , उद्धव तुपकर ,सतिश भंडारे ,आनंदा पांचाळ ,गजानन पांचाळ ,मुनेश्वर  सी डी कांबळे ,एकनाथ केंद्रे सर ,जाधव सर ,गणेश थोटे ,प्रवीण लोहाळे ,सुधाकर गंद्रेवाड ,तसेच तहसिल  समन्वयक मन्मथ थोटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *