नांदेड ; प्रतिनिधी
भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मील रोड भागात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून 146 नागरिकांना लस दिल्यानंतर मास्क, सॅनिटायझर पाण्याची बॉटल व बिस्किट वाटप करण्यात आले असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहातील लसीकरण शिबिराचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी मंडळ अध्यक्ष नवल पोकर्णा, जिल्हा उपाध्यक्ष प्रभू कपाटे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव, जिल्हा सचिव मारुती वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. लायन्स क्लब नांदेड सेंट्रल सचिव अरुणकुमार काबरा, कोषाध्यक्ष सुरेश निलावार, सह सचिव सुरेश शर्मा, प्रोजेक्ट चेअरमन बिरबल यादव यांनी प्रमुख अतिथींचे सिरोपाव व मोत्याची माळ देऊन सत्कार केला.राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, कपिल यादव, अशोक साखरे, राहुल बनसोडे, कैलास बरंडवाल, सुनील घाटोळ यांनी कोरोना लसीकरण न केलेल्या महिला, नागरिक, युवक,गर्भवती माता, अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक
यांचा सर्वे करून आधारकार्ड द्वारे नोंदणी केली. पूर्वी लोकांमध्ये जे लस घेण्याबाबत भीती होती ती भीती यावेळी दिसली नाही. काहीजणांनी कोव्हासीनचा पहिला डोस तर काहीजणांनी कोविशिल्ड चा दुसरा डोस घेतला. ज्येष्ठ नागरिक नरसिंगराव कहाळेकर, गोपालसिंह ठाकुर, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर ,कैलास महाराज वैष्णव, नरेश आलमचंदानी यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर पाण्याची बॉटल व बिस्किट वाटप करण्यात आले. महापालिकेतर्फे डॉ. अमीना रहमान, गजानन कंकाळ, शेख फिरोज, राजश्री कानगुले, सविता संपे यांनी चोख व्यवस्था केली होती. लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी शक्ती साखरे देविदास नगारे, नारायण पालवेकर ,अमोल कांबळे ,सुनील भोसले, संतोष सोने सचिन लोंढे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. दिव्यांग व्यक्तींना घरून आणून लसीकरणाची व्यवस्था केल्याबद्दल तसेच सर्वांना मास्क, सॅनिटायझर पाण्याची बॉटल व बिस्किट वाटप केल्याबद्दल संयोजकाचे अनेकांनी कौतुक केले.