केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर ;महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली, 24 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761 उमेदवारांपैकी 100 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी प्रथम तर विनायक नरवाडे दूस-या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार हे दोघे 36 आणि 37 व्या स्थानावर आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2020 च्या परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये मृणाली जोशी (36), विनायक कारभारी नरवाडे यांचा (37) क्रमांक आहे, रजत रविंद्र उभयकर यांचा (49) आहे. यासह जयंत नाहाटा (56), धीनह दस्तरगीर विनायक महामुनी (95) आहेत. लक्ष्य कुमार चौधरी (132) शुभम कुमार खंडेलवाल (133), रीचा कुलकर्णी (134),कमलकीशोर देशभुष खंडारकर (137), अवध सोमनाथ निवृत्त (166), अभ‍िषेक खंडेलवाल (167),गौरव रविंद्र सांळुके, पार्थ कश्यप (174), (182), प्रतिक अशोक धुमाळ (183), आषिश गंगवार(188), रीना प्रधान (194), नितीशा संजय जगताप (199), संचित गंगवार (222),तुषार उत्तम देसाई (224), प्रथमेश अरविंद राजशिरके (237),साहील खरे (243), संकेत बलवंत वाघे (266) मयुर खंडेलवाल (284) प्रवीण दराडे (३१२) , आकाश चौधरी (३२२), आनंद पाटील (३२५), सचिन चौबे (३३४), श्रीकांत विसपुते (३३५), साहिल संगवान (336), दिव्या गुंडे (३३८), सुहास गाडे (३५०), सागर मिसाळ (३५३), सुरज गुंजाळ (५५४), अनिल म्हस्के (३६१), अर्पिता ठुबे (३८३), सागर वाडी (३८५), आदित्य जिवने (३९९), अमोल मुरकुट (402) गोगणा गावित (४२२), अनिकेत फडतरे (४२६), श्रीराज वाणी (४३०), राकेश आकोलकर (४३२), वैभव बांगर (४४२), शुभम जाधव (४४५), अमर राऊत (४४९), शुभम नागरगोजे (४५३), ओंकार पवार (४५५), अभिषेक दुधाळ (४६९), प्रणव ठाकरे (४७६), श्रीकांत मोडक (४९९), यशवंत मुंडे (५०२), अनुजा मुसळे (५११), बानकेश पवार (५१६), अनिकेत कुलकर्णी (५१७), अश्विन राठोड (५२०),अर्जित महाजन (५२१), शुभम स्वामी (५२३), श्रीकांत कुलकर्णी (५२५), शरण कांबळे (५४२), स्नेहल ढोके (५६४), सचिन लांडे (५६६), स्वप्निल चौधरी (५७२), अभिषेक गोस्वामी (५७४), अनिल कोटे (५८४), विकास पालवे (५८७), विशाल सारस्वत (५९२),मोहम्मद शाहिद खान (597) हर्षल घोगरे (६१४), अजिंक्य विद्यागर (६१७),निलेश गायकवाड (६२९), हेताळ पगारे (६३०), रविराज वडक (६३३), कुणाल श्रोते (६४०), सायली गायकवाड (६४१) ,सुलेखा जगरवार (६४६) ,सुबोध मानकर (६४८) ,शिवहार मोरे (६४९) ,सुब्रह्मण्य केळकर (६५३) , सुमितकुमार धोत्रे (६६०), किरण चव्हाण (६८०), सुदर्शन सोनवणे (६९१),विनीत बनसोड (६९२), श्लोक वाईकर (६९९), अजय डोके (७०५), देवव्रत मेश्राम (७१३), स्वप्निल निसर्गन (७१४), शुभम भैसारे (७२७), पियुष मडके (७३२), शितल भगत (७४३), स्वरूप दीक्षित (७४९)


एक नजर निकालावर
केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2020 मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीरा झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 761 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –263, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 86, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 229, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 122, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 61 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 25 शारीरीकरित्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 150 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 75, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)-14, इतर मागास वर्ग -55, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती – ०1 उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू
भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 72, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –49, अनुसूचित जाती (एस.सी.) – २8, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 36 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 03, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 05, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.
भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 80, उमेदवार आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून – 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 30, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 15 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 302 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 118 उमेदवार, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 34, इतर मागास प्रवर्गातून – 84, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 43 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –23 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 118 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) -53, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 11 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 31, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 16 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
151 उमेदवारांची निवड तात्पुरती आहे.
अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *