कंधार ; प्रतिनिधी
जनता माझी व मी जनतेचा हे ब्रिद घेऊन सत्ता असो अथवा नसो आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण केलेले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी गेल्या अनेक दिवसापासून गावे, व वाडी – तांडे भेटीगाठीवर जोर दिला असून सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी धडपड चालवली आहे.
आज रविवार दि.२६ सप्टेंबर रोजी मौ. कंधारेवाडी ता. कंधार येथे भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.तसेच विकास कामाबद्दल चर्चा करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी भोजुवाडीचे सरपंच प्रतिनिधी सतीश
देवकते,युवानेते कृष्णाभाऊ भोसीकर ,कंधारेवाडीचे गावचे उपसरपंच सतीश डिगोळे,सरपंच प्रतिनिधि सदाशिव कंधारे, आईनाथराव कंधारे,मारोतीराव मंगनाळे, अरुण पाटील कंधारे,बालाजी ढाकणे,गुरुनाथ आमलपुरे,आदीसह गावातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.