कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील कुरूळा परिसरात मोठा पाऊस झाल्याने शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी मौ हणमंतवाडी येथील बबन दत्ता लिमकर वय 21 वर्षे सकाळी गावालगतच्या नदीतून वाहून गेला होता.त्याचा मृतदेह तब्बल २८ ते ३० तासांनी आज रविवार दि.२६ सप्टेंबर रोजी शोधून काढण्यास यश आले असून या तरुणाचा मृतदेह कुटूंबियाना अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला.
या तरुणाचा शोध घेण्यासाठी शोधपथकांनी व नातेवाईकांनी प्रयत्न चालवले होते. गावापासून सुमारे आर्धा ते एक किलोमिटर अंतरावर नदीत बबन दत्ता लिमकर याचा मृतदेह सापडला .
आज उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रेत गावकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी कंधार चे तहसीलदार कामटेकर व माळाकोळी पोलीस स्टेशन चे API यांची उपस्थिती होती.

