कंधार (प्रतिनिधी )
कंधार तालुक्यातील गंगनबीड येथे अतिवृष्टीच्या पाण्यामुळे नदीला मोठा पूर येऊन उमेश रामराव मदेबेनवाड यांचा पुरामध्ये वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता.उमेश मदेबैनवाड यांच्या कुटुंबियांना आज सोमवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उमेश चे आई वडील रामराव मदेबैनवाड, व आई संगीता मदेबैनवाड यांना 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, नायब तहसीलदार कामठेकर, गटविकास अधिकारी मांजरमकर ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वैजनाथ दाडगे, महावितरणचे अधिकारी जाधव, सरपंच व्यंकटी राहेरकर, तलाठी केंद्रे ,सह गावकरी, पदाधिकारी उपस्थित होते.