कंधार ; प्रतिनिधी
भारतीय सुरक्षा दक्षता परीषद नवी दिल्ली आणि एस.आय.एस.इंडीया लिमेटेड व युवासेना कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षा जवान व सुपरवायझर पदासाठी कंधार येथिल श्री शिवाजी हायस्कुल येथे मेघाभरती शिबीराची सुरुवात झाली असल्याची माहीती आयोजक कंधार तालुका युवासेना पदाधीकारी निरंजन वाघमारे हाळदेकर यांनी दिली.
या मेघाभरती उदघाटन सोहळ्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा,लोहा पंचायत समिती सदस्य बापू चव्हाण ,कंधार पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण ,युवासेना कंधार शहर प्रमुख धनराज लुंगारे,मुख्याध्यापक हरी चिवडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी शिबीरा विषयी माहीती सविस्तर पणे देण्यात आली दि.२७ सप्टेंबर ते २ अॉक्टोबर या सात दिवसाच्या कालावधीत सुमारे ७०० पदे योग्य त्या निकषा नुसार भरली जाणार आहेत .व कोरोना काळात अशी मेघा भरती ठेवल्या बद्दल बापू चव्हाण यांनी आयोजक निरंजन वाघमारे हाळदेकर यांचे कौतुक केले तर पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी माळरान असणाऱ्या कंधार तालुक्यातील तरुणांना आपल्या गावात भरती उपलब्ध करुन दिल्याबदल आभार व्यक्त केले.
यावेळी युवा सैनिक शरद पाटील,पंकज गादेकर,पुंडलिक कागणे,अजय वाघमारे,मोरेश्वर चाटे,प्रताप वाकडे,अनिल फुलवले,सचिन श्रीरंगवाड,आकाश कागणे,सुनिल राठोड,अजित तुतरवाड,बालाजी मुंडेआदीनी या शिबीरासाठी परीश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रवि कांबळे यांनी मांडले.