कंधार :- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संगमनेर जि. अहमदनगर यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक , आरोग्य , कला, क्रीडा, आदर्श सरपंच, पञकारिता आदि क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबदल प्रा. माधव बालासाहेब गिते यांना पञकारिता व समाजभुषन पुरस्कार देण्यात आला आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट पञकारिता व समाजभुषन पुरस्कार भगवती हाँल, गोकुळ शिरगांव, कोल्हापूर येथे मा. बाबासाहेब पावसे ( सरचिटणीस, सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र ) यांच्या हस्ते प्रा. माधव बालासाहेब गिते यांना पञकारितेत सर्व सामान्य जनतेला योग्य न्याय दिल्याबदल देण्यात आला अश्या असामान्य कार्य करणा-यांना, स्फुर्ती आणि प्रेरणा मिळवुन आधुनिक समाज निर्माण व्हावयाला चालना मिळावी यासाठी मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा राखण्यासाठी हा पुरस्कार महाराष्ट्रातुन निवडक असामान्य व्यक्तीला अदा केला जाता.
सरपंच सेवा संघ ही नोंदणीकृत संस्था संपूर्ण महाराष्ट्रातात व्यसनमुक्ती, ग्रामविकासाभिमुख कार्यासाठी, सर्व सामान्यांच्या न्याय मागणीसाठी कार्यरत आहे.सदरिल पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतुन सर्व स्तरातील दिग्गज मंडळी बहु संख्येने उपस्थित होते.
प्रा. माधव बालासाहेब गिते हे एक चौफेर व्यक्तीमत्त्व असुन त्यांनी आपल्या जिवनात राजकीय क्षेञात, शैक्षणिक , सांस्कृतिक आदि क्षेत्रासह दीन-दलित, शेतकरी , शेतमजुर, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, सामान्याच्या आड-अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न केले आहेत व करत राहतात.
प्रा. माधव गिते यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबदल बि. एस. मुंडे , डाँ. दिनकर जायभाये, सचिन मोरे, बंडु बोरगावे, मारोती पंढरे, एस. पि. केंद्रे , विजय शेटकर, मुन्ना खाडे, गंगाधर काळेकर, क्षेञीय सर, शंकर डिघोळे, राजु गिते, अशोक गुट्टे, मानसिंग केंद्रे आदिनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस पद्दम शुभेच्छा दिल्या आहेत.