कंधार दिनांक 2 आक्टोबर (प्रतिनिधी)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेड यांच्या वतीने 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त खादी उत्पादनावर 20 टक्के रिबेट देण्यात येते या रिबेट चा शुभारंभ कंधार येथे आज संजय भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
खादी भांडार कंधार येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन,पुष्पहार अर्पण व अभिवादन करून खादी खरेदी वरील 20% रिबेट चा शुभारंभ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी ,सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जि.प.सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर, कंधार तालुका कांग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष डॉ. राजेश गुट्टे, हमीदोदिन मौलीसाब, कृष्णाभाऊ भोसीकर,व्यवस्थापक प्रफ्फूल भागनगरे आदी सह खादी प्रेमी उपस्थित होत कंधार येथील भांडार मध्ये विविध खादीचे उत्पादने ठेवण्यात आली असून यामध्ये खादीचे रेडीमेड शर्ट पॅन्ट सुटींग शर्टींग जॅकेट्स राष्ट्रध्वज टॉवेल लुंगी चादर सतरंजी इत्यादी उपलब्ध आहेत. या उत्पादनाची खरेदी 20 टक्के रिबेट चा लाभ घेऊन खादी प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर करावे असे आव्हान संजय भोसीकर यांनी केले आहे.