नांदेड :- राऊतखेडा ग्रामपंचायत तर्फ कोविड -19च्या काळात वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा सन्मान सोहळा महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच श्रीमती महानंदा मारोती मडके व उपसरपंच श्रीमती दैवशाला संभाजी गर्जे ह्या होत्या तर उपाध्यक्षस्थानी श्रीमती मंजुषा सतीश बारादे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक के. एस. चोंडे साहेब हे होते.यावेळी आरोग्य क्षेत्रातील श्री डॉ श्रीमती माटोरे मॅडम , गोडबोले साहेब व गिते साहेब शिक्षण क्षेत्रातील ज़िल्हा परिषद राऊतखेडा येथील श्री जगताप सर, श्री शेख सर व ग्रामपंचायत मधील ऑपरेटर श्री चंद्रमुनी सूर्यवंशी, सेवक शिधोधन गरजे इ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बालकुस्ती पटू कु गंगा हनुमंत आगलावे हिने कुस्तीतील काही कला मान्यवरांना करून दाखविल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री मारोती मडके, श्री सतीश बारादे, उपसरपंच प्रतिनिधी किरण गर्जे,ग्रामपंचायत सदस्य चि सुमित बारादे,मारोतराव सिदगे, चेयरमन आगलावे, रावसाहेब सूर्यवंशी, स्वप्नील मडके व समस्त गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले.