मुदखेड – प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मध्ये पाऊस गेल्या अनेक वर्षापासून चालु असल्यामुळे शासनाला काम करण्यासाठी अनेक अडचणीला तोट द्यावा लागत असुन मुदखेड तालुक्यात ६० % टक्के शेत पीकाचे पंचनामा झाले असून बाकी राहीलेले पंचनामा लवकरच करण्यासाठी महसूल व कृषी अधिकारी यांना दिले आहे.
शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी जास्तीचा पिक विमा मिळुन देण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी रोहीपीपळगाव येथे सांगितले.
तालुक्यातील वसंतवाडी, रोहिपिंपळगाव तसेच तांडा येथे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शेत बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. वीज वितरण कंपनीच्या गलथानपणाचा कारभार शेतकऱ्यांनी चव्हाट्यावर आणला तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी बँकेमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जाच्या अडचणी पालकमंत्र्यांचा समोर मांडल्या. तालुक्याची निर्मिती होण्यापूर्वी नांदेड शहरातील स्टेट बँकेमार्फत पीककर्ज मिळत नसल्यामुळे संबंधित बँकेने महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुदखेड येथे पीक कर्जासाठी संदर्भित केले. परंतु वसंतवाडी, रोहीपिंपळगाव तांडा येथील शेतकऱ्यांना पूर्वी दत्तक असलेल्या बँकेमधूनच कर्ज मिळेल. अशी दिशाभूल बँक अधिकारी यांनी केल्यामुळे शेतकरी वर्ग संभ्रमित असल्याबाबत पालकमंत्र्यांच्या भेटीत व्यथा मांडण्यात आली. याबाबत पालकमंत्री काय मार्ग काढतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार, शहरध्यक्ष माधव कदम, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे संचालक भीमराव कल्याने, जिल्हा परिषदेचे पूर्व सदस्य रोहिदास जाधव, माजी सभापती रत्नाकर शिंदे, भाऊराव कारखान्याचे संचालक माधवराव पाटील शिंदे,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ मानिकराव जाधव, पंचायत समितीचे उपसभापती आनंदराव गादिलवाड, कृषी पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे शिवकुमार देशमुख, दतु देशमुख वाडीकर, नागोराव पाटील खानसोळे, मारोती पाटील शंकतीर्थकर, माजी सरपंच मारोती पाटील जाधव,
बालाजी पाटील सुर्यवंशी, नगरसेवक संजय आऊलवार,
प्रभाकर सोगे, सरपंच संध्या श्रीधर शिंदे, उपसरपंच अंकुश राठोड, सदस्य उद्धव पवार, गणेश जाधव, आनंदराव शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, माधव शिंदे, परसराम शिंदे, अतिख आयमद, रईस भाई, मनोज कमटे, यांच्या सह अदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.