बारुळ ; प्रतिनिधी
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेतील श्री शिवाजी विद्यालय बारुळ या ज्ञानालयात 27 सप्टेंबर 2021 रोजी मन्याड खोर्यातील सर्व शाळेतून फक्त बारुळच्या शिवाजी विद्यालयात विभागीय पर्यटन आदरणीय आयुक्त श्रीमंत हरकर साहेब यांच्या सुचने वरुन विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय अनिलजी वट्टमवार सर यांच्या पुढाकारात जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे सन्मानित अध्यक्ष प्रस्तूत विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय अनिल वट्टमवार सर यांनी भुषविले.संस्थेच्या प्रथेनुसार या वंदेमातरम या राष्ट्रगीताने सुरुवात झाली.
कार्यक्रमात शिकरे सर व कुरुळेकर सर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयातील ग्रंथपाल दत्तात्रय एमेकर सर उपस्थित विद्यार्थी व श्रोतेे
शिक्षक यांच्या समोर मनोगत व्यक्त केले.
सध्य्या कोराना महासंकटात सर्व देश नव्हे जगातील अर्थव्यवस्थेवर विपरीत झाला.यातच पर्यटन या क्षेत्रातही अनेकांना याची झळ सोसावी लागली.पर्यटन क्षेत्रात मन्याड खोरे मागे नाही.राष्ट्रकुट कालीन कंधारचा ऐतिहासिक भूईकोट किल्ला अनेक पर्यटकांना आकर्षित करतो.कंधार या ऐतिहासिक नगरीत अनेक शिल्पकलेचे उत्तमोत्तम कलावशेष जतन करण्यासाठी संस्थेचे संस्थापक व संचालक, माजी खासदार व आमदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांची भुमीका अगदी ठळक आहे.म्हणतात ना!जो व्यक्ती इतिहास घडवतो,तो कधीच इतिहास विसरु शकत नाही!
आज घडीला मानसपुरी,नवरंगपुरा, बहाद्दरपुरा सहित कंधार पंचक्रोशीत विखुरलेले अनेक शिल्पावशेष एकत्र करण्याचे काम डाॅ.भाई साहेब यांनी केले.त्यास माजी भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांची तोलामोलाची साथ लाभली.आपल्या बारुळ नगरीत लोअर मानार प्रकल्पास डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या नेतृत्वाखालील साडेतीन हजाराच्यावर जनतेनी सत्याग्रह करुन विरोध केला.त्याचे कारणही तसेच होते.डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून तुकाईच्या माळाला अप्पर मानार प्रकल्प करावी त्यांची अग्रही भुमिका होती.पण राजकीय आकसापोटी मन्याड खोर्याचा सुड घेण्याच्या वृत्तीने लोअर मानार प्रकल्प उभारला.हे या नगरीतील मराठवाडा पातळीवरील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.
राष्ट्रकुट भूईकोट किल्ला,साधुमहाराज मठ संस्थान,हाजी सय्याह सरवरे मगदुम साहेब यांचा दर्गा, या दोन गाद्या असल्यामुळेच कोणताही व्यावसायिक गादीवर बसुन व्यवसाय आजही करीत नाही.जलतुंग सागर, शिवेवरील महाजन यांच्या शेतातील मंडल सिध्दिविनायक,अमृत कुंड,सहाव्या ते आठव्या शतकात बौध्दपिठ होते.जैन तिर्थकर आदिनाथ व पार्श्वनाथाच्या मुर्त्या अस्तित्व आहेत.राष्ट्रकूट भुवन,शिल्प संग्रहालय शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथे राष्ट्रकूट कालिन शिलालेख, अर्धांगी नटेश्वर,उमा-महेश, सहस्र मुखी महावीर स्तंभ या मुळे आपल्या ऐतिहासिक कंधारला अन्यन्य साधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्रात एक अनोखे कैलास लेणं आहे.त्याची रचना आधी कळस मग पाया आहे.कंधारच्या पर्यटन क्षेत्रांना डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी जतन करण्यासाठी पदावर असतांना आणि तदनंतरच्या कालखंडात अविरत काम केले.या अनेक गोष्टींवर सांगोपांग विचार मांडून भुतपुर्व 20 वर्ष सेवा श्री शिवाजी विद्यालय बारुळ येथे केली.यावर काव्यात्मक प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या पर्यटन दिनाचे औचित्य साधून ज्युनियर विभाग व हायस्कूल विभाग अशा दोन विभागात जागतिक पर्यटन दिनावर निबंध स्पर्धा घेण्यात येवून प्रथम,व्दितीय, तृतीय व प्रोत्साहनपर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व महाराष्ट्र टूरीझमची कॅप देवून प्रमुख अतिथी व मान्यवर समर्थ हस्ते गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.गजानन मोरे सर व सांस्कृतिक विभाग प्रमुख होते. अध्यक्षीय समारोप करतांना वट्टमवार सरांनी पर्यटनास चालना मिळणे ही काळाची गरज आहे.अध्यक्षीय समारोपानंतर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
कार्यक्रमास ज्युनियर विभागाचे प्रमुख प्रा.गरुडकर सर,उपमुख्याध्यापक बाबुरावजी बसवंते सर,पर्यवेक्षक कुंडगीर सर, श्री शिवाजी प्राथमिक शाळा बारुळचे मुख्याध्यापक संघपाल वाघमारे,प्रा.तुळशीराम चौथरे सर गुराखीपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात भिष्माचार्य मेहेत्रे, राजकुमार ठाकुर,गोरे सर,
व्य॔कट पाटील,श्रीधर लूंगारे,सुंदर फलक लेखनाचे कलावंत पी.जी.मेहकर,पेन्सिल स्केच कलावंत पी.डी.सूर्यवंशी, गुद्दे सर,उत्कृष्ट सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवसांब सोनटक्के सर यांनी केले.