कोरोना ‘ परिस्थिती- वस्तुस्थिती आणि ‘ समज-गैरसमज ‘ विवेचन;बिलोली ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा विशेष सन्मान…



बिलोली:  नागोराव कुडके 


बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात शासकीय परिपत्रकाची अंमलबजावणी करत  कोविंड झाल्यानंतर यशस्वीपणे बाहेर आलेल्या ” कोरोना योद्धे ” यांचा  विशेष सन्मान करण्यात आला.
बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात शासकीय परिपत्रकाची अंमलबजावणी करत कोरोना आजारातून यशस्वीपणे बाहेर आलेल्या आणि समाजात कोरोना विषयीचे भय नाहीसे करणाऱ्या “कोरोना योद्ध्यांचा ” ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नागेश लखमावार  हे होते तर ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर ,डॉक्टर सतीश तोटावार, डॉक्टर सुनिल कदम, डॉक्टर सिद्धिकी, डॉक्टर कैलास शेळके, डॉक्टर संध्या गव्हाणे, डॉक्टर समरीन शेख, डॉक्टर पूजा भाकरे यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी कोरोना योद्धे तथा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गोविंद मुंडकर, कासराळी प्रसिद्ध व्यापारी संजय उपलचवार, बिलोली येथील प्रसिद्ध श्रीनिवास तुप्तेवार,  यांचा शाल  आणि वृक्ष देऊन विशेष सन्मान करण्यात आले.

  यावेळी पत्रकार गोविंद मुंडकर यांनी कोरोनाची    “परिस्थिती – वस्तुस्थिती” आणि      ‘ समज-गैरसमज ‘ याबाबत विस्तृत विवेचन केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्री नागेश लखमावार यांनी शासनाची भूमिका आणि कोविड केअर सेंटर यांची कार्यपद्धती येणाऱ्या अडचणी व केलेल्या उपाययोजना याविषयी सविस्तर विवेचन केले. यावेळी कृतार्थ  आणि कृतज्ञता व्यक्त झाली. डॉक्टर लखमावार यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या विषयी गौरवोद्गारही  काढले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉक्टर कदम यांनी केले या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व चिकित्सक, परिचारिका, कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईक तसेच नागरिक आवर्जून उपस्थित होते.#yugsakshilive.in

कोरोना योद्ध्यांचा विशेष सन्मान
कोरोना योद्ध्यांचा विशेष सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *