कंधार चे ग्राम दैवत अष्टभुजा खंडकी माता मंदिर येथे घटस्थापनेच्या मुहूर्तावर फुगडी

कंधार

कंधार ; प्रतिनिधी

कंधार चे ग्राम दैवत अष्टभुजा खंडकी माता मंदिर येथे

सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताईदेवरे चिखलीकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच महीलांनी फुगडी घातली.यावेळी सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर म्हणाल्या की,

सातत्याने आंदोलने करुन ठाकरे सरकारला मंदिरे उघडण्यास आम्ही भाग पाडले परंतु आज महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचा आनंद ओसंडून वाहत आहे तसेच लाखो गरिबांच्या घरची चूल आज सुरु होणार असल्याने समाधान वाटते आहे.

म्हणून आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा च्या वतीने पुष्पवृष्टी व देवीची आरती करून तसेच फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. यावेळी महिला मोर्चाच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष चित्ररेखाताई गोरे, कंधारच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई औरादकर, कल्पनाताई गिते, वंदना डुमणे ,तालुकाध्यक्ष भगवान भाऊ राठोड, शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,शिक्षकसंघटनेचे तालुका अध्यक्ष राजहंस शहापुरे, मधुकर भाऊ डांगे, अविनाश गिते, सागर ,रजत सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Devendra Fadnavis

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *