कंधार ; प्रतिनिधी
चिखलभोसी ता कंधार येथील युवामंच चे अध्यक्ष उमाकांत वरपडे यांना अर्धांगवायू झाला होता.ते आता बरे झाले असून त्या कुटूंबाला सावरण्यासाठी माजी जि.प.सदस्य डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी पुढाकार घेत चिखलभोसी या गावात लघू उद्योग सुरु करुन स्वतःच्या पायावर वरपडे दांपत्य उभे राहावे म्हणून सुमारे 50 हजार रुपयांची मदत करुन सामाजिक दायीत्व सिद्ध केले आहे.
याबाबत माजी जि.प.सदस्य डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी खालील मजकूर प्रकाशित केला आहे. त्यात ते म्हणतात माझ्या राजकारणाच्या सुरुवातीपासून माझ्या युवा मंचाच्या स्थापनेपासून सोबत राहणारा माझा इमानदार ,एकनिष्ठ ,हृदयापासून पूर्णपणे समर्थन करणारा मौ. चिखलभोसी ता कंधार येथील युवामंचाचा अध्यक्ष माझा सच्चा कार्यकर्ता उमाकांत वरपडे यांना अर्धांगवायू झाला.त्यामुळे
त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला बिकट परिस्थिती आली. ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी व त्यांच्या पत्नीने लेडीज एम्पोरियम हा छोटा उद्योग सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या कुटुंबाला मदत करुन उभे करावे या उद्देशाने त्यांना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी खासदार व आमदार आदरणीय डॉ भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या शतकोत्सवी वर्षाचे औचित्य साधून माझे बाबा व माझी आई सौ. चंद्रप्रभावतीबाई केशवरावजी धोंडगे यांच्या हस्ते वरपडे दाम्पत्याचा सत्कार करून त्यांना आई व बाबांच्या हस्ते 50000 रू.(पन्नास हजार) ची कर्तव्य समजून मदत केली.
डॉ भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या शतकोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आई सौ. चंद्रप्रभावतीबाई केशवरावजी धोंडगे यांच्या हस्ते 50 हजाराची मदत करुन अनोखी मदत केली आहे.या मदतीचे सर्वत्र कैतूक होत आहे.