कंधार ; नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दि.९ अॉक्टोबर रोजी शेकापूर, कंधार व बचोटीला जाऊन केंद्रे, पवार आणि धोंडगे परिवाराचे सांत्वन केले.
शेकापूर येथील पंडितराव केंद्रे, कंधार येथील नगरसेविका लक्ष्मीबाई पवार आणि बचोटी येथील चंपती पा. धोंडगे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते. त्यांच्या घरी जाऊन शनिवारी खासदार चिखलीकरांनी त्या त्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी कंधारचे उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, कंधार पंचायत समितीचे माजी सभापती,महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजीराव पाटील केंद्रे व संत गाडगे बाबा शिक्षण संस्था कंधार चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.एन.केंद्रे, प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे, प्राचार्य किशन डफडे, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अड. दिगंबर गायकवाड,
भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष अड. गंगाप्रसाद यन्नावार, प्रा. उत्तम केंद्रे, मुख्यध्यपक शिवाजी केंद्रे, हंसराज शहापुरे, उपसरपंच मोरेश्वर मोरे, केशव कदम, कंधार येथे, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, प्रा. बाळासाहेब पवार, मन्नान चौधरी, कृष्णा पापीनवार, व्यंकट मामडे, मधुकर डांगे, श्रीराम जाधव, निलेश गौर, एन. डी. जाभाडे, दयानंद कदम, सतीश कांबळे, सुनील कांबळे, राजीव पा. लाडेकर
आणि बचोटी येथे, मारोती पा. धोंडगे, आनंदराव पा. धोंडगे, सतीश पा. धोंडगे, श्रीराम डूबुकवाड, शंकर भोस्कर, स्वप्नील पा. हराळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.