मातंग समाजाच्या विविध मागण्या करीता माजी केंद्रीय मंत्री मा.ना. शरदचंद्रजी पवार यांना डेमोक्रेटिक पार्टि ॲाफ इंडियाचे निवेदन

नांदेड ; प्रतिनिधी

मातंग समाजाच्या विविध मागण्या करीता देशाचे माजी केंद्रीय मंत्री मा.ना. शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन डेमोक्रेटिक पार्टि ॲाफ इंडिया (DPI) च्या वतीने निवेदन दिले.

  1. क्रांतीवीर लहुजी उस्ताद साळवे मातंग समाजाचा अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करून अध्यक्षपदी श्री अजिंक्य (भैय्या) चांदणे यांची निवड करण्यात यावी.
  2. सोलापूर रेल्वे स्थानकास साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच नाव देण्यात यावे.
  3. सोलापूर विद्यापीठ यांच्या तर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर डॅाक्टरेट पदवी देण्याचा ठराव मंजूर सिनेट सभेत मंजूर झालेला तरी अद्याप ही त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये.. तरी त्याची अंमलबजावणी होणे बाबत.
  4. नांदेड येथील गऊळ या गांवी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा यासाठी सबंधतिना आदेश करावे.

सोहन लोंढे
प्रदेश युवक अध्यक्ष
DPI
९१३०५६५९१४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *