कंधार/प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील शेकापुर येथील रहिवासी लोहा शहरापासून काही अंतरावर असलेल्या धावरी येथील जि.प.प्रा. सा. धावरी ता.लोहा जि.नांदेड शाळेची विद्यार्थिनी,आदर्श शिक्षक निष्ठाचे राज्य सुलभक आदरणीय श्री आर.पी.केंद्रे सर यांची सुकन्या कु.अदिती रामदास केंद्रे या विद्यार्थीनीने आपली जिद्द् आणि चिकाटी, अभ्यासातील सातत्य व मेहनतीच्या जोरावर जवाहर नवोदय इ.6 वी प्रवेश परीक्षा २०२१ मध्ये उज्ज्वल यश संपादन करुन मुख्य यादीत आपली निवड निश्चित करुन नवोदय साठी पात्र झाल्या बद्द्ल तीचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोहा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा. रविंद्रजी सोनटक्के साहेब यांचे गुणवत्ता वाढीसाठी ध्येयाने प्रेरित होऊन करीत असलेले कार्य व प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा. सर्जेरावजी टेकाळे साहेब व कन्या लोहा चे केंद्रप्रमुख मा बाबुरावजी फसमले सर यांचे वेळोवेळी मिळालेले अन मोल मार्गदर्शन यामुळेच शाळेला मिळालेले हे यश आहे.
कु. अदिती ला भविष्यात असेच घवघवीत यश मिळत राहो.. शिक्षणात व स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करुन उत्तरोत्तर प्रगती होवो. यास्तव तिचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जि.प.प्रा.शाळा धावरी शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक बी वाय चव्हाण सर व सर्व शिक्षक बंधुभगिणींचे व अदितीचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा दिल्या व काका पत्रकार एस.पी केंद्रे व सर्व पत्रकार बंधुनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.