कंधार लोहा चे युवा नेते शिवराज पाटील धोंडगे यांनी पुणे येथे राष्ट्रवादी चे खासदार अमोल कोल्हे यांची घेतली सदिच्छा भेट

कंधार ; प्रतिनिधी

कंधार लोहा चे युवा नेते शिवराज पाटील धोंडगे यांनी पुणे येथे राष्ट्रवादी चे खासदार अमोल कोल्हे यांची दि.९ रोजी सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.

शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच नांदेड येथे राष्ट्रवादीचा भव्य आसा मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निघाला होता.सततच्या पावसाने व अतिवृष्टीने शेतकरी व शेती चे आतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मात्र पिक विमापण वेळेवर मिळत नाही त्यामुळे आपण स्वतः शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची विनंती युवानेते शिवराज पाटील धोंडगे यांनी पुणे येथे राष्ट्रवादी चे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन केली आहे तसेच यासह विविध विकास कामाबाबत यावेळी चर्चा झाली असल्याची माहीती
युवानेते शिवराज पाटील धोंडगे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *