लोहा तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू               

           

कंधार प्रतिनिधी-


लोहा तालुक्यातील आष्टूर व रिसनगाव या गावात दि.9 ऑक्टोबर 2021रोजी दुपारी 4 च्या सुमारास वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

                सदरिल घटनेची सविस्तर माहिती अशी की ,लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील बालाजी बापुराव पवार वय वर्षे 40 यांच्या दुपारी चारच्या दरम्यान शेतात काम करत असताना वीज पडून मृत्यू झाला. शेतमजूर असून दुसऱ्याच्या शेतात मजुरीने गेले असता वैजनाथ पवार यांच्या शेतात काम करत असताना ही वीज पडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

तर दुसरी घटना आष्टुर येथील महिपती दत्तराव मेहत्रे वय वर्षे 19 माधव म्हेत्रे यांच्या शेतात काम करत असताना दुपारी चारच्या दरम्यान वीज पडून मृत्यू झाला. दुपारी साडे चारच्या दरम्यान अचानक आलेल्या गडगडाटी पावसामुळे या दोन व्यक्तीचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *