महाविकास आघाडीच्या वतीने कंधार बंद ; कंधार तहसिलदारांना निवेदन

कंधार – महाविकास आघाडीने जाहिर केलेल्या महाराष्ट्र बंदला कंधार शहरातील शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन यशस्वी केले.

केन्द्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे कृषी कायदे रद्द करण्यासाठी वर्षापासून आदोंलन सुरू असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहेत. उलट  भाजपाचे केंद्रीय मंत्र्याचा मुलगा उत्तरप्रदेश येथील लखीमपुर येथे शेतकऱ्यांना कार खाली चिरडून टाकत आहेत. अन हे सरकार त्यांची दखल सुध्दा घेत नाहीत.पेट्रोल,गॅस याचे भाव गगनाला भिडले आहेत पण हे हुकूमशाही सरकार कुठल्याही प्रकारची जनसामान्यांना मदत करत नाही. याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधात व शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली त्यास कंधारच्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन यशस्वी केले यावेळी आठवडी बाजार असुनही व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद करून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला.

यावेळी राष्ट्रवादीचे बाबुराव केंद्रे,अॅड. विजय धोंडगे, डॉ. सुनिल धोंडगे, शिवसेनेचे बाळू पाटील कऱ्हाळे,लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार,काँग्रेस पांडागळे,युवक सरचिटणीस अजय मोरे,बाबुराव पुलकुंडवार,

शहराध्यक्ष हमीद सुलेमान,रा.काँ.रामचंद्र येईलवाड,तालुकाध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर,राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजकुमार किशनराव केकाटे,विधानसभा उपसंघटक दताभाऊ कारांमुंगे,सुरेश कल्हाळीकर,ज्ञानोबा मुंढे,शिवसेना तालुकाप्रमुख माधव मुसळे,लोहा शहरप्रमुख मिंलीद पवार ,

माजी शहरप्रमुख मारोती पंढरे,स्वप्नील पाटील गारोळे,सुरेश पाटील हिलाल,अमिन टेलर,पंचायत समिती सभापती लक्ष्मीबाई घोरबांड,दिगांबर वडजे,जयराम कांबळे,नगरसेवक शहाजी नळगे, सुधाकर अण्णा कांबळे,आरूण बोधनकर,मगदूम कुरेशी,अजय मोरे,स्वप्नील पाटील लुंगारे,

संरपंच सतिश देवकत्ते,सचिन पेटकर,अजिंक्य पांडागळे,बाळासाहेब पवार,माजी पंचायत समिती सदस्य माधव गिते,एन एस यु आय चे स्वप्नील परोडवार,ऋषीकेश बसवंते,बंडू कांबळे,तन्वीर शेट,मनोहर कारांमुंगे, अॅड.कुठे,दिलीप पवार,सुरेश राठोड,अमिन,परसराम कदम,चांद मौलीसाब यांच्या सह अनेक युवासैनिक, शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्येक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *