कंधार : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तालुका विधी सेवा समिती कंधार व अभिवक्ता संघ कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.10.10.2021 रोजी जिल्हा परिषद शाळा कोटबाजार कंधार येथे करण्यात आले हाते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री ए. एस. सलगर साहेब (जिल्हा न्यायाधीश कंधार)
प्रमुख अतिथी
मा. श्री डी.पी. गायकवाड
(अध्यक्ष अभिवक्ता संघ कंधार)
तसेच ॲड महेश काढणे
( सरकारी वकील)
ॲड दिलीप कुरुडे ,ॲड. पी.बी.कदम.ॲड. बाबू पाटील,ॲड खादर बेग, म. अतिख ,सरपंच प्र म सदरोदिन बबर मोहम्मद ,ग्रामसेवक पांडगळे ,शेख हबबू भाई,सदस्य म.जियाओदिन, सदस्य शे. पाशा,सदस्य पप्पू कांबळे, सदस्य. अथर बेग , म.मखसुद आणि सर्व ग्राम पंचायत कर्मचारी व गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती.