पारख गुणांची…

शिवास्त्र : पारख गुणांची


पैंजण हजारो रुपयांचे असले तरी पायातच घातले जाते, टिकली आठआण्याची असली तरी मस्तकी धारण केली जाते. किमतीवरुन योग्यता ठरवावी की योग्यतेवरुन किंमत.?

संत कबीर म्हणतात, ‘मोल करो तलवार का, पडी रहने दो म्यान.!’ माणसाची कदर, उपयुक्तता अथवा उपद्रवमुल्य या बाबी त्याच्या पद, शिक्षण, किंवा निसर्गतः वाढलेले वय या घटकांच्या जेष्ठतेवरुन नाही तर त्याचा प्रामाणिकपणा, भरवसा, इमानदारी, सत्यवचन, समर्पण, निष्ठा, लोकसंग्रह यावरून ठरवायला हवी. पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के. केवळ मतदान करतांनाच नाही तर दैनंदिन जीवनात माणसे जवळ करतांनाही हे तत्व लक्षात ठेवायला काय हरकत आहे.? 
जिंदगी कभी भी ले सकती है करवट, तू गुमां न कर।  बुलंदियाँ छू हजार, मगर उसके लिए कोई गुनात गेल्या तरी काही लबाड, स्वार्थी, लाळघोटे लाचार लोक असत्य लिखाण, असत्य कथन, असत्य वर्तन सोडत नाहीत, पण ही लबाड मंडळी समाजमान्यता कधी न कधी गमावते. खरे बोलणारा आणि सत्य लिहिणारा मात्र स्वतःच्या आणि जगाच्या नजरेत ताठ मानेनेच वावरतो. क्षुल्लक स्वार्थापायी खोटे बोलणाऱ्यांच्या पाठीचा कणा ताठ राहूच शकत नाही तर नेहमी सत्याची कास धरून मार्गाक्रमण करणाऱ्यांच्या नैतिक वजनाची तुलना जगात कशाशीच होऊ शकत नाही, कटू पण सत्य.! 
ना संघर्ष ना तकलिफे, तो क्या जिना है मजे मे, बडे बडे तुफान भी ढल जाते है, जब आग लगती है सिने मे.! जे समोर येईल ते स्विकारणं हाच यशाकडे नेणारा सर्वोत्तम मार्ग, प्रतिकुलतेचा बाऊ न करता त्यावर स्वार होऊन पुढे झेपावणं हा यशाचा सर्वोत्तम मंत्र. प्रतिकुलता हीच प्रेरणा असते. प्रतिकुलतेमुळेच कर्तृत्वाला आकार व कार्याला स्पष्टता येते. आपल्या सुप्त गुणांना व क्षमतांना चालना मिळते. वाटेत येणाऱ्या धोक्यांपेक्षा ध्येयाकडे झेपावण्याला जो प्राधान्य देतो, तोच यशस्वी होतो. कुणी मला उचलून शिखरावर ठेवण्याऐवजी माझं शिखर मीच गाठणार, हा स्वाभिमानच यशाची कवाडे उघडून देतो. अनुकुलता नव्हे तर प्रतिकुलताच वैभवी यश देते.. जुगनुओं तुम्हे नये चाँद उगाने होंगे, इससे पहले की अंधेरोंकी हुकुमत आ जाये.! 

पारख गुणांची
पारख गुणांची

इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील (नांदेड)        
मास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्ली     ,
  राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद         [email protected]Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *