लोहा; विनोद महाबळे
नागपूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 हा रस्ता मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून या महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या अशा शेतकऱ्यांना मावेजा मिळाला परंतु मावेजा देताना शहरी व ग्रामीण असा दुजाभाव करण्यात आल्याने लोहा शहरातील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी विरोध करून दोन गुणांक मावेजा मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, माजी सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांची भेट घेऊन वाढीव मावेजा मिळवून देण्यात यावा अशी विनंती केल्यावरून आमदार शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर सतत पाठपुरावा करून वाढीव मावेजा मंजूर करून आणला.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालक मंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची भेट घेऊन मावेजा दोन गुणांक तात्काळ वाटप करावा अशी मागणी केली, आमदार शामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून लोहा शहरातील शेतकऱ्यांना हादगाव ,अर्धापूर धर्तीवर दोन गुणांक वाढीव मावेजा मिळणार आहे .शहरातील बाधित जमिनीसाठी 160 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शामसुंदर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले की राष्ट्रीय महामार्गात लोहा येथील शेतकऱ्यांची 110 एकर जमीन ही बाधित झाली, या भागातील शेतकऱ्यांना मावेजा हा एक गुणांक आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दोन गुणांक असा भेदभाव करून शहरी भागातील शेतकऱ्यांवर अन्याय केला ,नांदेड जिल्ह्यातील हदगाव ,अर्धापूर शहरातील शेतकऱ्यांना दोन गुणांक मावेजा मिळाला मग लोहा शहरातील शेतकऱ्यांना दोन गुणांक मावेजा का मिळत नाही या संदर्भात आमदार शामसुंदर शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला होता.
वाढीव निधी तात्काळ वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्याकडे मागणी केली त्यांनी तात्काळ निधी वाटपाचे पत्र काढले यामुळे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून लोहा शहरातील शेतकऱ्यांना दोन गुणांक मावेजा मिळावा यासाठी लोहा शहरातील शेतकरी लक्ष्मीकांत संगेवार, माणिकराव मुकदम, शामअण्णा पवार ,ज्ञानोबा पाटील पवार यांच्या शिष्टमंडळाने आमदार शामसुंदर शिंदे यांच्याकडे मागणी केली होती .शेतकऱ्यांची मागणी रेटून धरून आमदार शामसुंदर शिंदे यांनी दोन गुणांक मावेजा मंजूर करून आणला यासाठी 160 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दोन गुणांक मावेजा तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करावा असा आदेश उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे, यामुळे लोहा शहरातील शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळणार आहे अशी माहिती यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, शाम अण्णा पवार ,माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, सिद्धेश्वर पाटील वडजे, सतीश कराळे ,प्रसाद जाधव,बालाजी इसादकर, शुभम कदम ,अशोक सोनकांबळे,प्रणव वाले ,वैभव हाके, अमोल गोरे यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.