गडगा वार्ताहार ———————————————————- मोटारसायकल व ट्रव्हल्सच्या अपघातात दोनजन गंभीर व एक जखमी झाल्याची घटना नरसी मुखेड रोडवर गडग्याजवळ ( ता.१५) रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली. अपघातातील दोघाची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तिनही जखमी पानसरे नगर नायगाव येथील रहिवासी आहेत.
नरसीहून मुखेडकडे जाणारी एम एच ०४ – जी ३४१२ या क्रमांकाची खाजगी ट्रव्हल्स गडगा मार्गे मुखेडकडे जात होती तर गडगा येथून नरसीकडे भरधाव जाणाऱ्या मोटारसायकल स्वाराने ( एम एच २६ – ७४९ ने ) ट्रल्हल्सला दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान गडगा येथून एक कि.मी. अंतरावर समोरासमोर जोराची धडक दिली. यात पठाण शादूल सलमान खान (२५), शेख मजहर (२४) व रमजान शेख (२३) तिघेजण होते त्यातील दोन जन गंभीर तर एक जन जखमी झाले आहेत.
सदरच्या अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बाचावार, गडगा बिटचे जमादार सहायक पोलीस उप निरिक्षक वाघमारे, हवालदार अब्दुल गफार शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेला पाचारण करुन सर्व जखमींना नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पण जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
एकाच मोटारसायकलवर तिघांनी भरधाव वेगात जावून ट्रव्हल्सला समोरासमोर धडक दिली असल्याने दोघेजण गंभीर एक जण जखमी झाले. यात ट्रव्हल्सचेही बरेच नुकसान झाले आहे. शुक्रवारी विजयादशमी असल्याने अनेकजन पुजा अर्चा करण्याच्या कामात व्यस्त असल्याने या अपघाताच्या घटनेने शासकीय यंत्रणेची चांगलीच पळापळ झाली आहे.