सर्वसामान्यांना कायद्याची माहिती असणे गरजेचे-न्यायाधीश आर.आर.खतीब मॅडम ; दिग्रस खुर्द येथे कायदेविषयक शिबीर

कंधार द

कायद्याची माहिती नसेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष करून सर्वसामान्यांना याचा फटका बसतो. कायद्याच्या अज्ञानामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. नको त्या भानगडी उत्पन्न होतात. हे सर्व टाळण्यासाठी कायद्यात काय काय तरतुदी आहेत हे जाणून घेणे महत्वाचे असते. त्याच बरोबर सर्वसामान्यांना कायद्याची माहिती असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सह दिवाणी न्यायाधीश आर.आर.ए. खतीब मॅडम यांनी केले.


तालुक्यातील दिग्रस खुर्द येथे दि. १५ रोजी तालुका विधिसेवा समिती व अभिवक्ता संघाच्यावतीने कायदेविषयक शिबीर पार पडले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अड. दिगंबर गायकवाड, सरपंच सौ. संगीता वाघमारे, सरकारी वकील अड. महेश कागणे, अड. दिलीप कुरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


न्यायाधीश खतीब मॅडम पुढे म्हणाल्या की, कायदा सर्वांसाठी असतो. विशेष करून महिला, मुले, जेष्ठांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. या कायद्यामुळे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होते. त्यांना न्याय मिळतो. कायद्याची माहिती नसल्यामुळे पक्षकारांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास दूर सारण्यासाठी सर्वसामान्य माणसाला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. सद्याच्या काळात मुले आईवडिलांना सांभाळत नाहीत. यामुळे वयस्कांना जीवन कंठीत करणे अवघड होत आहे.


मुलगा असो की मुलगी त्यांना आईवडिलांचा सांभाळ करणे आवश्यक आहे. ही जाचक प्रथा दूर करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहेत. एखाद्या मुलाने किंवा मुलीने आईवडिलांना सांभाळले नाही तर त्यांच्या विरोधात न्यायालयात पोटगी मागण्याचा अधिकार आहे.

न्यायालय सर्व बाबींची खातरजमा करून जेष्ठांना पोटगी मंजूर करते. असे अनेक कायदे आहेत. या कायद्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी या कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.


यावेळी अड. पी. बी. कदम, अड. रवी केंद्रे, अड. सागर डोंगरजकर, अड. गजानन बनसोडे, अड. सौ. जोंधळे मॅडम, मा. उपसभापती रामजी पा. दिग्रसकर, नामदेव कल्याणकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता सोनकांबळे, पद्माकर सोनकांबळे,

बाबू सोनकांबळे, जयराम कल्याणकर, न्यायालयीन कर्मचारी जाधव मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश वाघमारे यांनी केले तर आभार ग्रामसेवक गंगाधर कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *