युवानेतृत्व : शहाजी नळगे

कंधार ;

कंधार शहराचे राजकारणातील कुशल नेतृत्व राजे शहाजी नळगे हे गेल्या अनेक वर्षापासुन राजकारणात सक्रिय झाले आहेत.

शहराच्या विकास साधण्यासाठी राजकारणातील सर्व समिकरण जुळवून व सर्वच विचारांचे नगरसेवक सोबत घेवून आणि सर्वांची मोट बांधत सर्वांना एकदिलाने घेऊन विकासाचे राजकारण करत आहेत.

कंधार शहरासाठी कोठ्यावधीचा निधी मिळवण्याची धडपड चालवली असुन राज्याचे सार्वजनिक बाधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हाचे पालकमंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेब यांच्या सतत संपर्कात राहून विकास निधी मिळवून घेण्यापाठी नगरसेवक शहाजी नळगे हे प्रयत्नशील आहेत.

कंधार शहरातील शॉपींग सेंटर ला निधी मिळवून ते प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी अनेक अडचणीवर मात करून आज महाराणा प्रताप चौक येथे भव्य अशी नगरपालिकेच्या वतीने शॉपींग सेंटर च्या इमारतीचे बांधकाम चालू आहे व येण्याऱ्या काळात सर्वच विस्तापित व्यापाऱ्यांना दुकाने मिळवून देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शॉपींग सेंटर च्या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहेत.

शहरातील मुख्य रस्ताचा प्रश्न जो पेचात सापडला आहे तो सोडविण्यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे.

असे धडपडणारे युवानेतृत्व तथा विकासरत्न नगरसेवक शहाजी अरविंदराव नळगे यांचा आज वाढदिवस त्या निमिताने त्यांना युगसाक्षी परिवाराच्या वतीने शुभेच्छा….

त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा छोटाशा प्रयत्न….!

राजे शहाजी नळगे यांचा जन्म १६/१०/१९७५ रोजी सधन व शिस्तप्रिय कुटूंबात झाला.नांदेड जिल्हाचे पालकमंत्री , राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष
अरविंदराव नळगे व नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे यांच्या सुसंस्कृत शिकवणीत शहाजी नळगे यांचा जडण घडण झाली.

अन्य पालकांप्रमाणे आपल्या मुलांनी शिकाव हा वडीलांचा ध्यास आणि ते पुर्ण करण्यासाठी बालवयात धडपड चालु होती.दहावी ,बारावी ,पदवी ,पदवित्तर शिक्षण झाले.एखादी उत्तम नौकरी करावी अशी इच्छा बाळगुळ तयारी चालवली देखील परंतु मुळात पिंड नेतृत्व करण्याचा . यांच्या घरात वडिलांचा राजकीय वारसा असल्याने राजकारणात त्यांना जास्तीची मेहनत करावी लागली नाही.

घरी शेती असल्यामुळे त्यांनी आपल्या शिक्षणाचा फायदा प्रत्यक्ष अधुनिक शेती करण्याकडे वळवला. राजकारणा पेक्षा शेतीकडे महत्व त्यांचे विशेष असते.तञंज्ञानाच्या सहाय्याने अधुनिक शेतीवर जोर धरला त्यानी सुधारीत शेती केली.

अनेक कृषी मेळाव्यात,कृषी प्रदर्शन या मध्ये भाग घेतला.त्यातुनच त्यांनी शेतीमध्ये नवनवे प्रयोग राबवले .आपल्या मित्रांना सोबत घेऊन शेती सहली काढल्या. व्यवसाय करुन उत्तम युवा शेतकरी म्हणून ओळख त्यांनी मिळवली आहे.

आज ते राजकारणात सक्रीय असले तरी ते पहीले प्राधान्ये हे शेतीलाच देत असतात.रोज सकाळी चार वाजता पहाटे उठुन ते शेतात जावून दिवस भराच्या कामाचे नियोजन लावुन पाठपुरावा करतात.

काम करायचे नसेल तर चालेल पण शेती मायच्या कामात हयगय ते खपवून घेत नाहीत. शेतीत विविध प्रयोग ते घेतात वेगवेगळे पिके

घेवून उत्पनाचे अनेक व्रिकम त्यांनी निर्माण करत आपण शेतीत ही नंबर वन असल्याचे सिद्ध केलं आहे म्हणूनच शेतीच्या उत्पनात ते आजही बादशाहा आहेत.

  राजकारणाबाबत म्हणजे ते  वडिलांचा वारसा चालवण्यासाठी  राजकारणात आले.आज ते एका वार्डाचे नगरसेवक असले तरी राजकारणातील सर्व खाचखळगे चागलेंच जाणुन आहेत.दोस्तासोबत दोस्ती जिवापार आणि दुश्मनासोबत दोस्ती ते कायम ठेवतात.

प्रतिनिधी म्हणून स्वतः लक्ष घालुन काम करतात म्हणून सर्व कंधार शहरांचा कारभार चालवण्यात त्याचा हिस्सा आहे.

पुर्वी राजकारणात काम करतांना संघटन असावे असे त्यांना नेहमी वाटत होते.परंतु म्हणावे तसे संघटन होत नव्हते.त्यांनी आपली भुमिका बदलली आणि कमी कालावधीत शहाजी राजे नळगे हे नाव तरुणांच्या तोंडात व टाळक्यात घोळु लागल .आली अडचण लावा फोन आणि प्रश्न खलास असा प्रयोग चालु केला .

आपल्या गोड वाणीतुन व शांत स्वभावातुन शहरात मोठ्या प्रमाणात युवा संघटन निर्माण केले आहे. प्रत्येकांच्या सुखा -दुखात व अडिआडचणीत धावुन जात असल्याने लोकांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकी निर्माण झाली आहे.

त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने शहरातील युवकांचे शहाजी नळगे यांच्यावर असलेले प्रेम दिसुन येते. अनेक दिवसापासुन शुभेच्छाचा वर्षाव सर्वाचे लक्ष वेधणारा आहे.

बरं एवढेच नाही तर असा संयमी नेता कुणाचा दादा तर कुणाचा भाऊ ,आणि अण्णा होत शहाजी नळगे आपले मापूसकीचे नाते जपत असतात.

येणारा काळ त्यांच्यासाठी निश्चितपणे मोठ यश घेवून येणार आहे.मोठ नेतृत्व अधिक मोठ होणार असल्याच्या खुणा खुणावत असल्या तरी राजकारणातील काही कुशल डावपेच शिकणे गरजेचे आहे .

सहजपणे सर्वाचे प्रश्न तात्काळ सोडवता यावे म्हणून त्यांनी शहाजी राजे नळगे मित्र मंडळाची स्थापना अनेक वर्षापूर्वी केली मित्र मंडळाच्या मदतीने ते अनेक परीवाराला
आधार देतात.

डॉ.दिपक बडवणे ,गुलाबराव नळगे ,शितल भगत ,बापुराव महाराज,बंडू कांबळे, सुहास कांबळे ,सुरेश राठोड ,संतोष कुंभारगावे ,प्रदिप मंगनाळे ,मोहित केंद्रे ,बालाजी बडवणे ,सुनिल परळकर ,अमीन भाई ,शिवाजी पवार ,नांगेश पवार ,
बंडु अण्णा मामडे ,भगवान पाटील जाधव ,नागरगोजे सर ,
अमर लाला ,गठ्ठू भावजी ,किशनराव तपासे आदी शहाजी राजे मित्र मंडळाचे महत्वाचे घटक असुन शहाजी नळगे यांच्या मागे हे मावळे खंबीरपणे नेहमीच उभे असतात.

राजे आपणास वाढदिवसा निमित्तानं खुप खुप शुभेच्छा ….

दिगांबर वाघमारे , कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *