राष्ट्रसेवा म्हणून सर्व राजकीय नेत्यांनी लसीकरणा संदर्भात  जनजागृती करावी -गणेश कुंटेवार

कंधार ; प्रतीनिधी

  कोरोना व्हायरस चा सध्या प्रदुर्भाव कमी झाला असला तरी आपण व आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करुन घेणै गरजेचे आहे.काही नागरीकांनमध्ये लसी संदर्भात गैरसमज असल्यामुळे बरेच नागरीक लसीकरण करुन घेण्यास घाबत आहेत.अशा नागरीकांना जागृक करणे गरजेचे आहे.निवडणुकीत मतदानासाठी आपणा जसे फिरतो तसेच लसीकरणाचे महत्व पटवुन देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कंधार शहरात 100%लसीकरणा करुन घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार  घेतला पाहीजे असे प्रतिपादन शिवसेना माजी नगरसेवक गणेश कुंटेवार यांनी केले आहे.

    संभाजी नगर येथील अनेक नागरीकांनी लसीकरण करुन घेतले नव्हते. अशा सर्वाची यादी तयार करुन त्यांना लसीचे महत्व पटवुन दिले.गेल्या दोन वर्षापासुन कोरोना व्हायरस  या महामारीचे  देशावर संकट घोंगवत असताना सर्व देश लसीची वाट पाहत होत.आपल्या भारत देशाच्या शास्त्रज्ञांच्या अथग परिश्रमाने लसीचा शोध लावला.अनेक नागरीक लस घेण्यासाठी समोर येत आहेत.असे असले तरी काही नागरीकांच्या मनामध्ये लसी संदर्भात भिती घर करुन बसली आहे.सध्या कोरोना कमी झाला असला तरी संपला नाही .येणारी तिसरी लाठ रोखण्यासाठी लस हीच आपली ढाल आहे त्यामुळे शंभर टक्के लसीकरण झाले पाहीजे .राजकीय नेते निवडणुकीच्या काळात मतदानासाठी ज्या पध्दतीने घरोघरी जाऊन मतदान मागातो त्याच पध्दतीने राष्ट्र सेवा व प्रशासनाला मदत म्हणून सर्वानी लसी संदर्भात जनजागृती करणे गरज असल्याचे मत शिवसेना माजी नगरसेवक गणेश कुंटेवार यांनी व्यक्त केले.

      नगरसेवक गणेश कुंटेवार यांनी आपल्या वार्डातील नागरीकांना लसी संदर्भात मार्गदर्शन करुन तिस जनाचे लसीकरण करुन घेतले यावेळी वैद्यकीय आधिक्षक डाॕ.सुर्यकांत लोणीकर यांनी ग्रामीण रुग्णालय कंधार येथिल टिमला वार्डात पाठवुन लसीकरण करुन घेण्यात आले यावेळी डाॕ.संतोष पदमावार,डाॕ.डी.एल.गुडमेवार,यशवंत पत्रे,शेख सरवर नब्बी यांनी लसीकरण घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *